Amrit Railway Scheme: मध्य रेल्वेकडून प्रवाशांना अधिक जलद व आरामदायी सेवा देण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत सोलापूरसह ११ रेल्वे स्थानकांवर विविध विकासकामे सुरू आहेत. सोलापूर, बेलापूर, गाणगापूर, कुर्डुवाडी, पंढरपूर, दुधनी, धाराशिव, लातूर, कलबुर्गी, शहाबाद व वाडी या स्थानकांचा यात समावेश आहे. दौंड ते वाडी दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांनी दिली..ही मार्गिका २०३१ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर रेल्वे गाड्यांचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर, कलबुर्गी, कुर्डुवाडी व जेऊर स्थानकांवर ‘डिजिटल ॲक्सेस मॅप बोर्ड’ बसवण्यात आले आहेत. तसेच सोलापूर स्थानकावर ‘रेल कोच रेस्टॉरंट’ सुरू करण्यात आले आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक साइन-ऑन / ऑफ प्रणालीही सुरू करण्यात आली असून, मध्य रेल्वेत असा उपक्रम राबवणारा हा पहिलाच विभाग ठरला आहे..Railway Work Issue: आरमोरीच्या आमदारांसह सहा जणांवर गुन्हा दाखल.मुदतीत कामे पूर्ण करण्याची गरजटिकेकरवाडी येथे चार नव्या मार्गिका उभारण्याचे काम सुरू असून, दौंड-वाडी मार्गावरील तिसरी व चौथी मार्गिका २०३१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. धाराशिव- सोलापूर मार्गाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, त्यासाठी २०३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दमाणीनगर येथील रेल्वे पुलाचे बांधकाम एमएसआरडीसीकडून सुरू असून, त्यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत आहे. या सर्व प्रकल्पांची मुदत लक्षात घेता कामाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे..Panand Road: हिंगोलीतील ६२५ किलोमीटर पाणंद रस्त्यांसाठी प्रस्ताव.अमृत योजनेत झालेली प्रमुख कामेवंदे भारत गाडीला अतिरिक्त डबेसोलापूर व कलबुर्गी स्थानकांवर ब्रेल लिपीतील फलककुर्डुवाडीसह अनेक स्थानकांवर लिफ्ट सुविधा.माल वाहतुकीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमआपत्कालीन प्रसंगी प्रवाशांसाठी अखंडित मदतपंढरपूर स्थानकावर अतिरिक्त पादचारी पूल व प्रवेशद्वारसोलापूर विभागात १७० नवे सीसीटीव्ही कॅमेरे व ३० सौरऊर्जा प्रकल्प.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.