Amaravati Politics: दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. समितीतील १८ पैकी १२ संचालकांनी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने सभापतींचे पद धोक्यात आले आहे. प्रस्तावाची कागदपत्रे जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) कार्यालयाकडे सादर करण्यात आली असून बैठकीची तारीख निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..समितीच्या १८ सदस्यीय संचालक मंडळात दोन तृतीयांश म्हणजेच १२ संचालकांनी सभापतींविरोधात भूमिका घेतली आहे. या प्रस्तावाचा अहवाल तयार करून बैठकीची तारीख निश्चित करण्यासाठी तसेच प्राधिकृत अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे..Maharashtra Politics: ‘मविआ’ लढविणार विधान परिषदेच्या १७ जागा.माहितीनुसार, २०२२ मध्ये निवडून आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अलीकडील कामकाजाबाबत नाराजी वाढल्याने अविश्वास प्रस्तावाची मागणी पुढे आली..Lasalgaon APMC Market: सभापती, उपसभापती निवड ऐनवेळी रद्द.समर्थक, विरोधकांचे गणितअविश्वास प्रस्तावावर उपसभापती राजू कराळे, साहेबराव भदे, राजेश खेडेकर, कांचनमाला गावंडे, गजानन देवतळे, प्रभाकर तराळ, राजेश राठी, अनिल भारसाकडे, आसिफभाई, बाळासाहेब वानखडे, मनीष कोरे आणि सुनील डिके यांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती आहे. दुसरीकडे सभापती सुनील गावंडे यांच्यासह बाळासाहेब हिंगणीकर, राजेंद्र वडाळ, मनीषा अरबट, भारत आठवले आणि डॉ. अक्षय गावंडे हे सहा संचालक त्यांच्या समर्थनात असल्याचे सांगितले जात आहे.....असे आहे बलाबल१८ सदस्यीय संचालक मंडळ.१२ संचालकांचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा.६ संचालक सभापतींच्या समर्थनात.डीडीआर कार्यालयाकडून बैठकीची प्रक्रिया सुरू.जिल्हाधिकारींकडे प्राधिकृत अधिकारी नियुक्तीचा प्रस्ताव पाठविला.ं.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.