Damping off Disease: पावसाळ्यात भाजीपाली पिकांमध्ये रोप कोलमडण्याची अवस्था बऱ्याचदा पाहायला मिळते. पण ही केवळ एक अवस्था नसून एक रोग आहे ज्याला इंग्रजीत डॅम्पिंग ऑफ म्हटले जाते. जो विशेषत: टोमॅटो, मिरची, कांदा, वांगी, कोबी, भेंडी, पालेभाज्या, फळभाज्या अशा सर्वच भाजीपाला पिकांवर आढळतो.