Fruit Orchard Damage : अवकाळी पाऊस वाऱ्यामुळे रब्बी, फळपिकांचे नुकसान

संत्रा, आंबा आदींची फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सेनगाव तालुक्यात वीज कोसळ्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Fruit Orchard Damage
Fruit Orchard DamageAgrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) अनेक तालुक्यांत सोमवारी (ता. ६) आणि मंगळवारी (ता. ७) वेगाचे वारे विजांच्या कडकडात हलका ते मध्यम पाऊस झाला. वाऱ्यामुळे गहू,ज्वारीचे पीक आडवे झाले.

हरभरा भिजला. संत्रा, आंबा आदींची फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सेनगाव तालुक्यात वीज कोसळ्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Fruit Orchard Damage
Chana Market : हरभरा उत्पादकांची होतेय लूट

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, हिंगोली जिल्ह्यातील सेनागाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत आदी तालुक्यातील अनेक मंडलात सोमवारी (ता. ६) आणि मंगळवारी (ता.७) अवकळी पाऊस झाला.

सध्या या जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभऱ्याची सुगी सुरु आहे. उशीरा पेरणी केलेली पीके उभी आहेत. वेगाच्या वाऱ्यामुळे ज्वारी, गव्हाचे पीक आडवे झाले. कापणी केलेला हरभरा तसेच काढणी सुरू असलेली हळद भिजली.

Fruit Orchard Damage
Maharashtra Budget Session 2023 : अवकाळी, गारपीटीच्या नुकसानभरपाईसाठी विरोधक आक्रमक

आंबा, संत्र्याची फळगळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पानकन्हेगाव (ता. सेनगाव) शिवारात शेतात काम करत असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळ्याने त्याचा मृत्यू झाला.

नुकसानग्रस्त पीकांचे पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com