Poultry, Onion Damage : वादळी वाऱ्याने पोल्ट्री, कांदा शेड भुईसपाट

Onion Shed Damage : शुक्रवारी (ता. ९) व शनिवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्याच्या पूर्व भागात हजेरी लावली. ज्यामधे सटाणा, येवला, मालेगाव व निफाड तालुक्यांना फटका बसला.
Onion Damage
Onion DamageAgrowon

Nashik News : शुक्रवारी (ता. ९) व शनिवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्याच्या पूर्व भागात हजेरी लावली. ज्यामधे सटाणा, येवला, मालेगाव व निफाड तालुक्यांना फटका बसला. अनेक ठिकाणी कृषी व्यवसायिकांचे नुकसान झाले.

येवला तालुक्यात पोल्ट्री शेड व निफाड तालुक्यात लासलगाव परिसरातील कांदा व्यापाऱ्यांचे कांदा शेड भुईसपाट झाले. त्यामुळे या पावसाचा मोठा फटका कृषी व्यवसायिकांना बसल्याने अडचणीत वाढ झाली आहे.

गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. त्यामध्ये येवला तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरगाव येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावल्याने कृष्णा सोमासे यांच्या पोल्ट्री फार्मचे शेड जमीनदोस्त झाले.

शेडसह भिंतीही जमीनदोस्त झाल्याने सुमारे सहा हजार पक्षी दबल्याने मृत्यू झाल्याचे सांगताना सोमासे यांना अश्रू अनावर झाले. सोमासे यांनी दहा दिवसांपूर्वी पोल्ट्रीत पक्षी टाकलेले होते. अचानक आलेल्या वाऱ्यात हा पोल्ट्री फार्म उडून गेल्याने पक्षी मृत झाले.

या नुकसानीमुळे शेडसह शेतकऱ्याचे २० ते २५ लाखांचे नुकसान झाले. पंचनामे करून मदत देण्याची मागणी सोमासे यांनी केली आहे.

Onion Damage
Urea Damages Onion : युरिया टाकल्याने २५० क्विंटल कांद्याचे नुकसान

लासलगावसह परिसरात शनिवारी (ता. १०) दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील दोन कांदा व्यापाऱ्यांचे तीन शेड कोसळले. या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा साठविलेला होता. ढगांच्या गडगडाटासह व वेगवान वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.

पावसामुळे येथील कांदा व्यापारी अनिल अब्बड यांच्या वर्धमान ट्रेडिंग कंपनीचे दोन कांदा शेड जमीनदोस्त झाले. त्यात दहा ते बारा लाखांचा कांदा होता, असे त्यांनी सांगितले. अन्य व्यापारी भाऊसाहेब लक्ष्मणराव जगताप यांचे जगताप अँड कंपनी यांचे शेड कोसळले. त्यातही अंदाजे सात लाखांचा कांदा होता.

सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवितहानी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी शेतात काढून पडलेल्या कांद्याचे या पावसामुळे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

राजापूर (ता. येवला) येथे अनेक ठिकाणी कांदा चाळीचे शेड व पत्रे उडाली आहेत. घर, चाळ, शेततळे आदीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. संतोषी माता कृषी भांडार या दुकानाचे संपूर्ण शेड उडून तारेवर पडले. विद्यालयाजवळील शेडही दोनशे फूट उडून गेले होते, यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com