Crop Damage : अमरावतीत १२ हजार हेक्‍टरवर पिकांना दणका

Unseasonal Rain : गारपीट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंगळवारी (ता. ९) अमरावती जिल्ह्यात संत्रा बागांसह भाजीपाला व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowom
Published on
Updated on

Nagpur News : गारपीट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंगळवारी (ता. ९) अमरावती जिल्ह्यात संत्रा बागांसह भाजीपाला व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाकडून या नैसर्गिक आपत्तीची तत्काळ दखल घेत करण्यात आलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणात १२ हजार २७८ हेक्‍टरवरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दर्यापुरातील सिव्हिल लाइन, समता नगर, तहसील क्‍वॉर्टर, साईनगर, रेल्वेगेट परिसरात वृक्ष उन्मळून पडली. काही ठिकाणी विजेचे खांब वाकत वीज तारा तुटल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

Crop Damage
Unseasonal Rain : उन्हाळी पीक, फळबागांना अवकाळी पावसाचा फटका

चांदूरबाजार तालुक्‍यात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका पिकांना बसला असून संत्रा, मोसंबी व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. वरुड, मोर्शी तालुक्‍यांतही आंबिया बहरातील संत्रा फळांचे मोठे नुकसान केले.

वरुड, मोर्शीत सुमारे ७० हजार हेक्‍टर संत्र्याची लागवड आहे. आंबिया बहराची फळे सध्या बोर आणि लिंबाच्या आकाराची आहेत. त्याची ९० टक्‍के गळ झाल्याचा दावा शेतकरी करीत आहेत.

Crop Damage
Unseasonal Rain : सांगोल्यात अवकाळी पावसाने द्राक्ष, आंबा, केळीचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात धो-धो

यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसामुळे रब्बी गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. दिग्रस, पुसद, यवतमाळ या तालुक्‍यांमध्ये पाऊस झाला.

...असे आहे नुकसान (हेक्टर)

चांदूरबाजार ५ हजार ७३२

अचलपूर ११३०

वरुड ५ हजार ४१६

आंबिया बहारातील संत्रा फळे ही काही भागात लिंबू तर काही भागात बोराच्या आकारांची आहेत. गारपीट व पावसाचे थैमान सुमारे पाऊणतास होते. त्यामुळे या फळांची ९० टक्‍के गळ झाल्याचा अंदाज आहे. शासनाने याची दखल घेत भरपाईसाठी पुढाकार घ्यावा.
- संजय राऊत, इत्तमगाव, ता. वरुड, जि. अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com