Banana Crop Damage
Banana Crop DamageAgrowon

Banana Crop Damage : वादळी पावसाचा केळीला फटका

Banana Update : रविवारी (ता. ४) मध्यरात्री झालेल्या वादळामुळे मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत.
Published on

Nanded Banana News : मार्चमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने पुन्हा एकदा प्रकोप केला आहे. रविवारी (ता. ४) मध्यरात्री झालेल्या वादळामुळे मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मार्च महिन्यात १६ तारखेला बारड, डोंगरगाव, निवघा या भागांत मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊन गारपीट झाली होती. या संकटातून शेतकरी सावरत असताना पुन्हा एकदा वादळाचा तडाखा बसला आहे.

मागील संकटातून काही प्रमाणात केळी बागा शिल्लक होत्या. पुन्हा रविवारी मध्यरात्री तुफान येऊन मुदखेड तालुक्यातील बारड परिसरातील डोंगरगाव, निवघा, वेजापूर पार्डी, बारड, खांबाळा, धनंज या शिवारात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले.

Banana Crop Damage
Banana MSP : केळीला हमीभाव निश्‍चित करावा

वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे काही वेळातच होत्याचे नव्हतं झालं. निसवलेली केळी या वाऱ्यामुळे आडवी पडली. शेतकऱ्याने अधिकचा खर्च करून पोटच्या लेकरांसारखं जोपासलेली केळी बाग काही वेळातच आडवी झाली आहे.

यामुळे पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानीबाबत प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाल्या एकरा एकरावरील बारा हजार केळी भूईसफाट होऊन वीस लाखांचे नुकसान झाले आहे.
शंकर व्यवहारे, शेतकरी, डोंगरगाव, ता. मुखदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com