डॉ. विनायक शिंदे-पाटील, सुधीर सूर्यगंधDairy Technology Jobs for Freshers: गावागावांतील दूध संकलन केंद्रांपासून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक ऑटोमॅटिक डेअरी प्लांट्सपर्यंत पोहोचला आहे. वेगाने वाढणाऱ्या क्षेत्राला आता केवळ पारंपरिक मनुष्यबळ नको आहे, तर तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे प्रशिक्षित, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले आणि आधुनिक उद्योग व्यवस्थापन समजणारे ‘स्मार्ट’ व्यावसायिक हवे आहेत. .नेमकी हीच गरज ओळखून, १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बी.टेक. डेअरी टेक्नॉलॉजी’ हा चार वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम चांगली संधी आहे. हा चार वर्षांचा (एकूण ८ सेमिस्टर्स) व्यावसायिक आणि तांत्रिक पदवी अभ्यासक्रम आहे. हा कोर्स म्हणजे केवळ गायी-म्हशींचे पालन किंवा दूध काढणे नाही, तर हा पूर्णपणे एक हाय-टेक अभियांत्रिकी अभ्यासक्रम आहे..दूध प्रक्रिया : दुधाची शुद्धता तपासणे, पाश्चरायझेशन, होमोजेनायझेशन आणि निर्जंतुकीकरण करण्याचे प्रगत तंत्रज्ञान.मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती : दूध, दही, तूप या पारंपरिक पदार्थांपासून ते आंतरराष्ट्रीय मागणी असलेल्या चीज, बटर, वेगवेगळ्या फ्लेव्हर्सची आईस्क्रीम्स, फ्लेवर्ड मिल्क, व्हे प्रोटीन आणि बेबी फूड यांसारख्या प्रॉडक्ट्सच्या निर्मितीमागील विज्ञान.अत्याधुनिक प्लांट संचालन : हजारो लीटर्स क्षमतेच्या अत्याधुनिक ऑटोमॅटिक डेअरी प्लांटचे इंजिनिअरिंग, रेफ्रिजरेशन, कोल्ड स्टोअरेज आणि ऑटोमेशन हाताळणे..Dairy Farming Success Story: गाईंच्या शुद्ध वंशावळ निर्मितीचा ध्यास .१) बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. यासाठी खालील विषयांचे गट ग्राह्य धरले जातात:पीसीएमबी : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्रपीसीएम : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितपीसीबी : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र.२) ज्या विद्यार्थ्यांनी १२ वीमध्ये गणित विषय घेतलेला नाही, ते विद्यार्थीसुद्धा या कोर्सच्या माध्यमातून थेट बी.टेक. ही प्रतिष्ठित अभियांत्रिकीची पदवी मिळवू शकतात. अशा विद्यार्थ्यांसाठी पहिल्या वर्षात गणिताचा एक सोपा ब्रिज कोर्स घेतला जातो, जेणेकरून पुढील तांत्रिक गणिते सोडवणे सोपे जाते. तसेच १२ वीमध्ये क्रॉप सायन्स, हॉर्टिकल्चर किंवा डेअरी सायन्ससारखे व्यावसायिक (व्होकेशनल) विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शिक्षणात चांगला फायदा होतो..Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य.प्रवेश प्रक्रियाप्रवेश घेताना विद्यार्थ्याने निवडलेले महाविद्यालय किंवा विद्यापीठ हे योग्य मान्यताप्राप्त असणे गरजेचे आहे. बी.टेक. डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी देशातील तीन मुख्य नियामक आणि शिखर संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवेश प्रक्रिया आणि अभ्यासक्रम राबवला जातो.भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) : कृषी आणि दुग्ध व्यवसाय शिक्षणाचा राष्ट्रीय दर्जा निश्चित करणारी सर्वोच्च संस्था..विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) : पदवीच्या शैक्षणिक वैधतेची आणि विद्यापीठांच्या मानकांची निश्चिती करणारी संस्था.अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) : हा अभियांत्रिकी (बी.टेक.) अभ्यासक्रम असल्याने तांत्रिक शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या मंजुरीसाठी महत्त्वाची संस्था.पात्रता परीक्षा विद्यार्थ्याने राज्य पातळीवरील एमएचटी-सीईटी किंवा राष्ट्रीय पातळीवरील आयसीएआर-एआयईईए ही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.प्रवेश केंद्रीय पद्धत : महाराष्ट्रात आणि इतर राज्यांत या तांत्रिक जागांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीद्वारे (कॅप राउंड्स) किंवा विद्यापीठ स्तरावर गुणवत्तेनुसार केले जातात.आवश्यक कागदपत्रे : १२ वीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, संबंधित प्रवेश परीक्षेचे स्कोअर कार्ड, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि अधिवास प्रमाणपत्र..विविध विषयडेअरी इंजिनिअरिंग : रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने चालणारे डेअरी प्लांट्स हाताळण्याचे कौशल्य.डेअरी केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी : दुधाची गुणवत्ता, त्यातील अन्नघटक, सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि फूड सेफ्टीचा सखोल अभ्यास.इन-प्लांट ट्रेनिंग (इंटर्नशिप) : अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांना नामांकित व्यावसायिक डेअरी उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा ४ ते ६ महिन्यांचा प्रॅक्टिकल अनुभव दिला जातो. यामुळे पदवी पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थी उद्योगासाठी सक्षम बनतो. दूध उद्योगात आता पारंपरिक पद्धतींऐवजी ऑटोमेशन, ब्रँडिंग, फूड सेफ्टी आणि डिजिटल ट्रेसिबिलिटीला प्रचंड महत्त्व आले आहे. .परिणामी, प्रशिक्षित डेअरी टेक्नॉलॉजिस्टची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. यामध्ये डेअरी टेक्नॉलॉजिस्ट, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर / फूड सेफ्टी ऑफिसर, प्रॉडक्शन मॅनेजर, सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक्स एक्झिक्युटिव्ह याचबरोबरीने शासकीय नोकरीत संधी उपलब्ध होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमार्फत (उदा. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना - पीएमएफएमई) स्वतःचा मिल्क प्रोसेसिंग प्लांट, मिनी डेअरी युनिट, पनीर, तूप, आइस्क्रीम किंवा चीज निर्मिती युनिट सुरू करण्यासाठी ३५ ते ५० टक्के अनुदान आणि सुलभ कर्ज उपलब्ध होते.- डॉ. विनायक शिंदे-पाटील, ७०७१७७७७६७(लेखक डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.