Milk Rate : ‘लाडकी बहिण’नंतर सावत्र दुधवाल्यांवरही कृपादृष्टी करा

Dairy Farmer : ‘लाडकी बहिण योजना’ झाली असेल तर सावत्र दुधवाल्यांवरही कृपादृष्टी करा’ असे मिम्स आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
Milk Rate
Milk RateAgrowon

Nagpur News : ‘लाडकी बहिण योजना’ झाली असेल तर सावत्र दुधवाल्यांवरही कृपादृष्टी करा’ असे मिम्स आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. राज्यात उत्पादकता खर्चापेक्षा कमी दराने दुधाची खरेदी होत असल्याने दुग्ध उत्पादकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अनेक ग्रुप्सवर अशा ‘मिम्स’चा पाऊस पडत आहे. त्या माध्यमातून दूध उत्पादक आपला संताप व्यक्‍त करून सरकारला हटके पद्धतीने धारेवर धरीत आहेत.

विदर्भात चाऱ्याच्या समस्येमुळे दूध संघांना घरघर लागली. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा वगळता उर्वरित दहा जिल्ह्यांमध्ये सहकारी दूध संघाचे अस्तित्वच उरले नाही. भंडारा जिल्ह्यात देखील खासगी कंपन्यांचा शिरकाव झाल्याने दूध संघाकडील संकलन काही लाख लिटरवरुन ४४ हजारावर आले आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात दूध संघाकडून २८ रुपयांचा दर दिला जात आहे.

Milk Rate
Milk Rate : दूध दर घसरल्याने रोज ३५ लाखांचा फटका

पश्‍चिम महाराष्ट्रात दुधाचे संकलन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र दुधाला दर दिला जात नसल्याचा आरोप आहे. राज्य सरकारने पाच रुपये प्रतिलिटर अनुदानाची घोषणा केली. मात्र यामुळे आपल्याकडील संकलन होत असलेल्या दुधाची आकडेवारी जाहीर करावी लागेल, या भीतीने अनेक संघांनी हे काम केलेच नाही.

त्यामुळे या लाभापासून पशुपालकांना वंचित राहावे लागल्याचा आरोप आहे. त्यामुळेच पश्‍चिम महाराष्ट्रात त्यातही मुख्यत्वे नगर जिल्ह्यातील पशुपालकांनी याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. प्रांत कार्यालयात शेण फेकत या प्रकाराबद्दल रोष व्यक्‍त केला जाणार आहे.

Milk Rate
Milk Rate Protest : दूध दर वाढीसाठीच्या आंदोलनांची धग कायम

‘...तर लाडका भाऊ, लाडका जावई योजना’

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याविरोधात आंदोलन केले जात असतानाच आता काही व्हॉटसॲप ग्रुपसह समाज माध्यमांवर शासनाच्या धोरणावर व्यंगात्मक टीकाही केल्या जात आहेत.

‘‘लाडकी बहिण योजना झाली असेल तर शासनाने सावत्र दुधवाल्यांवर देखील कृपादृष्टी करावी’ अशी खोचक टीका करण्यात आली आहे. त्यानंतर एकाने यावर उत्तर देताना ‘आपले सरकार आल्यास लाडका भाऊ, लाडका जावई, लाडका भाचा, लाडका पुतण्या' अशा अनेक योजना राबविल्या जाणार असल्याचे सांगत सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com