Dairy Farmers : सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दूध संकलनात सातत्याने घट होत असल्याचे समोर आले आहे. हवामानातील बदल, पावसाचा प्रादुर्भाव आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दूध भेसळीविरोधात उघडलेल्या कडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्याचे दूध संकलन एक लाख १५ हजार दोनशे लिटरने कमी झाले आहे. एफडीएच्या कारवाईचा धसका दूध भेसळ करणाऱ्यांनी घेतल्याचे चित्र आहे. .जुलै महिन्यापासून जनावरांचा ‘पृष्टकाळ’ (दूध कमी होण्याचा काळ) सुरू होतो, तसेच जुलै महिन्यात संपूर्ण सातारा जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनावरांना पुरेसा आणि सकस ओला चारा उपलब्ध होऊ शकला नाही. या नैसर्गिक कारणांमुळे दुधाच्या नैसर्गिक उत्पादनात घट झाली आहे..Children Nutrition: उत्पादनाबरोबर दुधाचे सेवनही वाढवा.दुसरीकडे, राज्यभरात राबवण्यात आलेल्या ‘दूध भेसळ तपासणी मोहिमे’मुळे जिल्ह्यातील दूध क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एफडीए व प्रशासनाकडून संकलन केंद्रांवर कडक तपासणी सुरू झाल्याने कमी प्रतीचे व भेसळयुक्त दूध स्वीकारणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या कारवाईचा मुख्य फटका फलटण तालुक्यातील होळ येथील दूध भेसळ करणाऱ्या उत्पादकांवर पडलेल्या छाप्यानंतर बसला. या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, दुधात पाणी व इतर घटकांची भेसळ करण्याचे प्रमाण घटले आहे..जूनच्या (२०.६३४ लाख लिटर) तुलनेत जुलैमध्ये (१९.४८२ लाख लिटर) एकूण १.१५२ लाख लिटरची (१ लाख १५ हजार २०० लिटर) मोठी घट नोंदवण्यात आली आहे. यामध्ये सहकार क्षेत्रात ०.०२१ लाख लिटरची किरकोळ वाढ झाली असली, तरी खासगी दूध संकलनात तब्बल १.१३६ लाख लिटर आणि मल्टिस्टेटमध्ये ०.०२८ लाख लिटरची मोठी घट झाली आहे. प्रशासकीय कारवाया आणि नैसर्गिक अडचणींमुळे भेसळयुक्त दुधाला आळा बसून शुद्ध दूध संकलनाला चालना मिळत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे..Milk Subsidy : दूध उत्पादकांना अखेर दिलासा.आकडेवारीतील घट (आकडे लाखांत)जिल्ह्यातील दूध संकलनाची आकडेवारी पाहता, मे २०२६ मध्ये एकूण २०.९१२ लाख लिटर दूध संकलन झाले होते. जून २०२६ मध्ये ते २०.६३४ लाख लिटरवर आले, म्हणजेच मेच्या तुलनेत जूनमध्ये ०.२७८ लाख लिटरची घट झाली..जुलै २०२६ मध्ये ही घट अधिक तीव्र झाली. जुलैत शासन स्तरावर ०.०००, सहकार क्षेत्रात ०.८०९, मल्टिस्टेट ०.१९१ आणि खासगी क्षेत्रात १८.४९१ लाख लिटर असे एकूण १९.४८२ लाख लिटर संकलन झाले..जूनच्या (२०.६३४ लाख लिटर) तुलनेत जुलैमध्ये (१९.४८२ लाख लिटर) एकूण १.१५२ लाख लिटरची (१ लाख १५ हजार २०० लिटर) मोठी घट नोंदवण्यात आली आहे. यामध्ये सहकार क्षेत्रात ०.०२१ लाख लिटरची किरकोळ वाढ झाली असली, तरी खासगी दूध संकलनात तब्बल १.१३६ लाख लिटर आणि मल्टिस्टेटमध्ये ०.०२८ लाख लिटरची मोठी घट झाली आहे. प्रशासकीय कारवाया आणि नैसर्गिक अडचणींमुळे भेसळयुक्त दुधाला आळा बसून शुद्ध दूध संकलनाला चालना मिळत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.