Milk Consumption : भारतात लोकप्रिय पेय म्हणून चहा आणि कॉफीकडे पाहिले जाते. दिवसभरात चहा आणि कॉफीच्या माध्यमातून दुधाचं सेवन करणाऱ्यांची संख्या ५९ टक्के आहे, असे गोदरेज जर्सीने एका अभ्यासात सांगितले आहे. नुकताच गोदरेज जर्सी इंडियाज लॅक्टोग्राफ फायंडिंग्स २५–२६ अहवाल प्रसिद्ध केला आहे. गोदरेज जर्सीसोबत युगोव्हने आठ शहरांमध्ये सर्वेक्षण केले आहे. .भारतीयांच्या आहारात दूध पेय म्हणून घेतले जात नसले तरी दही, पनीर आणि बटरचे वर्चस्व कायम आहे. यामध्ये दह्याचा ८० टक्के, पनीरचा ७६ टक्के आणि बटरचा ७४ टक्के समावेश आहे. याबद्दल बोलताना गोदरेज जर्सीचे मार्केटिंग प्रमुख शंतनू राज यांनी बिझनेस लाईन या वृत्तपत्राला सांगितले की, “हा अभ्यास दाखवतो की, दूध भारतीयांच्या ताटातून नाहीसे होत नाही, फक्त त्याचे स्वरूप बदलत आहे. ६७ टक्के भारतीय अजूनही चहामधून दूध घेतात, तर ४४ टक्के लोक प्रोटीन शेकद्वारे दूधाचा समावेश करतात, ज्यातून तंदुरूस्त राहण्याकडे भारतीयांचा कल दिसतोय.” असे ते म्हणाले..Milk Adulteration: ‘मिल्क स्कॅन चाचणी’द्वारे दूधभेसळ रोखणार : मंत्री कदम.या सर्वेक्षणानुसार, दुध आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचा नियमित आहारात समावेश करणाऱ्या नागरिकांची संख्या ७१ टक्के आहे. तर पारंपारिक ग्लासभर दुध आता विविध पद्धतीने दैनंदिन आहारात घेतले जाते. दुध पिणाऱ्यांपैकी ५८ टक्के नागरिक केशर-बदाम मिश्रित दुध घेतात. तर ५१ टक्के नागरिक उर्जादायी पेय म्हणून सुकामेवा वा फळाच्या ज्यूसमधून घेतात. तसेच सण-उत्सवांच्या काळात ४१ टक्के भारतीय मिश्रित दुधाला पेय म्हणून पसंती देत असल्याचे या गोदरेजच्या अभ्यासात सांगण्यात आले आहे..दुधाची आठवणभारतीय नागरिकांच्या आहारात दुधाचा संबंध विविध पद्धतीने येतो. ५२ टक्के भारतीय साधे दूध बालपणीच्या आठवणींमुळे आजही घेतात. ४९ टक्के जणांना शाळेत जाण्यापूर्वी दिले जाणारे दूध आठवते, ४३ टक्के लोकांना झोपण्यापूर्वीचे दूध किंवा रात्रीचे फ्लेवर्ड दूध आठवते. तसेच ४१ टक्के जण ‘दूध-भाकरी’ची आठवण सांगतात, तर ४५ टक्के जणांना घरातील मोठे सदस्य चहा घेत असताना त्यांना पर्याय म्हणून दिलेले दूध आठवते..अभ्यासात असेही नमूद केले आहे की ६४ टक्के पालकांना आज त्यांच्या मुलांचे दूध सेवन कमी असल्याने त्यांची हाडांची घनता कमी असू शकते, असे वाटते. यापैकी ५४ टक्के पालकांना त्यांच्या मुलांची शारीरिक वाढ त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या तुलनेत मंद वाटते. मुलांना दूध देणाऱ्या पालकांपैकी ७३ टक्के कॅल्शियमसाठी, ६२ टक्के प्रोटीनसाठी, ६० टक्के फिटनेस आणि वजन नियंत्रणासाठी, तर ६२ टक्के दिवसभराची ऊर्जा मिळावी म्हणून दूध देतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.