Nutrition Issue: डहाणू प्रकल्पांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या ३५ शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या भोजनात तीन महिने चपातीचा समावेश नव्हता. त्यामुळे २० हजार निवासी, अनिवासी मुलांना अपूर्ण पोषण आहार मिळत असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. .आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार, पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठी कांबळगाव येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना राबविण्यात येते. विविध आश्रमशाळांना दररोज येथून भोजनाचा पुरवठा होतो. शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना चपाती, भाजी, वरण-भात, सॅलड, लोणचे असे पोषक पदार्थ देणे बंधनकारक आहे. मात्र, चपाती तयार करणारे स्वयंचलित तीन महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना चपाती मिळत नसल्याने आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..Agriculture Education: अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज : नार्वेकर.अभ्यासावर परिणामअन्नघटकांच्या पुरवठ्यातही वेळोवेळी अनियमितता होत असल्याच्या तक्रारी काही शिक्षक, पालकांनी केल्या आहेत. त्यामुळे वाढत्या वयातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण आहार मिळाला नाहीतर शारीरिक विकास, अभ्यासावरील एकाग्रतेवरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे षोषणा आहारातील त्रुटी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे..Teacher Workload: पंत, पंतोजी आणि पंचाईत!.तात्पपुरता दिलासाविद्यार्थ्यांना चपातीचा पुरवठा खंडित झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात अन्य ठिकाणाहून चपात्या आणून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नवीन यंत्र कार्यान्वित करून नियमित व दर्जेदार पोषण आहाराचा पुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे..मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील चपातीच्या यंत्रात तांत्रिक बिघाड झाला आहे. नवीन यंत्र काही दिवसांत कार्यान्वित होईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणाहून चपात्या पुरवल्या जात आहेत.- विशाल खत्री, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.