Solapur News: वीज ग्राहकांना ऑनलाइन सेवा- सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यातून ग्राहकांचा वेळ, श्रम व पैसा वाचतो. या पार्श्वभूमीवर सायबर भामट्यांकडून ग्राहकांना कॉल येत आहेत. एसएमएस, व्हॉट्सॲप संदेश, ई-मेलद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती, ओटीपी, बँक तपशील किंवा युपीआय माहिती मागितली जाते. बिल न भरल्यास वीज कनेक्शन तत्काळ तोडले जाईल, अशी धमकी देऊन फसवणूक केली जात आहे..अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या एसएमएस/कॉल/ व्हॉट्सॲप संदेशांना प्रतिसाद देऊ नका. महावितरण अधिकृत संकेतस्थळावरूनच ‘एसएमएस’ पाठवते. ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाचा मोबाईल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा ओटीपी शेअर मागत नाही..Electricity Bill Dues: महावितरण थकबाकीदारांची नावे जाहीर करणार.त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी फक्त अधिकृत महावितरण ग्राहक मोबाईल अॅप, वेबसाइट (www.mahadiscom.in) किंवा अधिकृत पेमेंट पर्यांयाचाच वापर करावा. कुठल्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये किंवा अनोळखी अॅप डाऊनलोड करू नये. सोशल मीडियावरून किंवा व्हॉट्सॲपवरून आलेल्या बनावट मेसेजेसकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांनी केले आहे..Electricity Bill Recovery: कोल्हापूर परिमंडळात ६८ कोटींची वीजबिल थकबाकी.फसवणूक झाल्यास काय करावे?सायबर गुन्हेगारांनी आपल्याला फसविल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधावा. नजीकच्या सायबर पोलिसांत किंवा सायबर गुन्हा हेल्पलाइन १९३० किंवा https://cybercrime.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर तक्रार नोंदवावी..ग्राहकांनी अधिक माहितीसाठी महावितरण कार्यालयास किंवा महावितरणच्या २४ तास सेवेतील अधिकृत मध्यवर्ती ग्राहक सुविधा सेवा केंद्राचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक १९१२/ १९१२० वर संपर्क साधावा, असेही आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.