Paddy Herbicide: भात उत्पादकांसाठी 'क्रिस्टल'नं विकसित केलं तणनाशक

Rice Production : जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक आणि निर्यातदार देश अशी भारताची ओळख आहे. देशातील पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यात भात पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
Paddy Herbicide
Paddy HerbicideAgrowon
Published on
Updated on

Rice Crop : जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक आणि निर्यातदार देश अशी भारताची ओळख आहे. देशातील पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यात भात पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

महाराष्ट्रातही कोकणात आणि तसेच नाशिक, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये भाताची लागवड केली जाते. परंतु भात पिकात वाढणाऱ्या लहान आणि मोठ्या पानाच्या लव्हाळा व घाणेरीसारख्या तणामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

शेतकऱ्यांना पिकातील वाढत्या तणाचा आर्थिक फटका बसतोय. तण वाढलं की, शेतातील उत्पादनात घट येते. त्यामुळे थेट उत्पन्नावर परिणाम होतो.

आधीच मजूर टंचाई आणि त्यात मजूरीचे दर वाढल्यामुळे शेतकरी हैराण आहेत. भात पिकांमध्ये वाढणाऱ्या तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी पिकाच्या मशागतीवर भर देत आहेत. परंतु खर्च आणि वेळ अधिकचा लागतो.

वाढत्या तणामुळे शेतकरी बाजारात उपलब्ध असणारी तणनाशक फवारणी करतात. तणनाशकांची वाढत्या मागणीमुळे देशातील तणनाशक निर्मितीची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत चाललीय. २०२२ मध्ये जगभरात ३९ बिलियन डॉलरची बाजारपेठ वेगवेगळ्या तणनाशक कंपन्यांनी व्यापली आहे.

Paddy Herbicide
Paddy procurement : शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीवर १५९,६६० कोटींची धान खरेदी

देशात तणनाशक निर्मिती कंपन्यांमध्ये क्रिस्टल, बाविस्टिन, टिल्ट, ब्लू कॉपर, अॅझोट्रिक्स आणि मेंटॉरसारखे ब्रॅंड आहेत. यातीलच एक क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेड या तणनाशक निर्मिती कंपनीने अलीकडेच भात पिकातील लहान आणि मोठ्या तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तणनाशक बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. सिकासो असं या तणनाशकाचं नाव आहे.

येत्या भात लागवडीच्या हंगामात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगढमधील भात उत्पादकांसाठी सिकोसा बाजारात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

तसेच सिकासो भातातील तण समूळ नष्ट करतं. त्यामुळे उत्पादनात वाढ होते, असा दावा कंपनीने केलाय. क्रिस्टल, बैटल आणि मित्सुई ऍग्रीसायन्स इंटरनॅशनल या कंपन्यांनी संयुक्तपणे सिकासो तणनाशक विकसित केलंय. बैटल ही इंग्लंडची कंपनी आहे तर मित्सुई ऍग्रीसायन्स इंटरनॅशनल जगभरात विविध क्षेत्रात आघाडीवर असलेली कंपनी आहे.

सिकोसाची मागील पाच वर्षात विविध राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये चाचणी घेण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीने सिकोसा बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी क्रिस्टलने भाताचे बियाणे आणि किडनाशक तयार केले आहेत. त्यामुळे आता क्रिस्टलने तणनाशक निर्मितीत प्रवेश केला आहे. दरम्यान, क्रिस्टलने मागील दोन वर्षांत चौदा उत्पादनं बाजारात आणली आहेत. तर येणाऱ्या काळात अजून ७ उत्पादनं बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com