Crop Damage : तेहतीस हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Monsoon Retreat : राज्यात यंदा नको तितका बरसलेला मॉन्सून परतीच्या प्रवासात देखील सतावतो आहे. अतिवृष्टीमुळे चालू आठवड्यात आतापर्यंत ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात यंदा नको तितका बरसलेला मॉन्सून परतीच्या प्रवासात देखील सतावतो आहे. अतिवृष्टीमुळे चालू आठवड्यात आतापर्यंत ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. ऑगस्टमधील पावसामुळे सहा हजार हेक्टरवरील पिके यापूर्वीच वाया गेली आहेत. २६ ऑगस्टपर्यंत खरिपाच्या अंतिम अहवालानुसार, २८९ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला होता.

सप्टेंबरमध्ये खरिपाची पिके परिपक्वतेच्या व त्यानंतर कापणीच्या अवस्थेत येणार असल्यामुळे पावसाची उघडीप आवश्यक होती. परंतु परतीचा पाऊस खरिपांना त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Rain
Retreating Monsoon : परतीच्या पावसाचा दणका, लातुरात घरात शिरले पाणी

चालू आठवड्यातील पावसाचा सर्वाधिक तडाखा बीड जिल्ह्याला बसला. या भागातील आठ हजार हेक्टरवरील सोयाबीन, बाजरी, उडीद व कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास ११ जिल्ह्यांमधील सोयाबीनला पावसाचा फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील पाच हजार हेक्टरवरील, तर धाराशिव जिल्ह्यातील सात हजार हेक्टरवरील उडीद, सोयाबीन, मका आणि कांद्याचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

Rain
Crop Damage : अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी १३ कोटींची मदत जाहीर

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, भाताला एरवी पाऊस उपयुक्त असतो. मात्र पालघर भागात अतिपावसामुळे ५५ हेक्टरवरील भाताचे पीक वाया गेले आहे. याशिवाय जिल्हानिहाय झालेल्या खरीप पिकाच्या हानीचे हेक्टरमधील अंदाजे आकडे असे : धुळे १०७० हेक्टर, नाशिक २५, जळगाव ३१७, नगर ९१६, पुणे ४३०, सोलापूर ३२००, छत्रपती संभाजीनगर ४५००, तर सांगली ५००० हेक्टर. राज्यात यंदा १४५ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरिपाचा पेरा केला आहे. चांगल्या पावसामुळे अधिक उत्पादनाची आशा बळीराजाला आहे.

सोयाबीनचा विक्रमी पेरा

ऐन कापणी आणि काढणीच्या कालावधीत पाऊस झाल्यास हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ शकतो. सोयाबीनचा यंदा विक्रमी पेरा झाला आहे. सध्या राज्यात ५१ लाख हेक्टरच्या पुढे सोयाबीन व ४१ लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्रावर कपाशीचे पीक उभे आहे. परतीच्या पावसातून बचावल्यास या नगदी पिकांपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com