Buldhana News: यंदाच्या खरीप हंगामात बुलडाणा जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत (जून ते सप्टेंबर) साडेसात लाख हेक्टरपैकी तब्बल तीन लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील अर्धा हंगाम आधीच बाधित झालेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात अडकण्याची शक्यता आहे..जूनमध्येच पेरणीनंतर ८७ हजार ३९० हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले. जुलैमध्ये ३१ हजार ५४२ हेक्टर, ऑगस्टमध्ये तब्बल एक लाख १३ हजार १३३ हेक्टर, तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ६८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पाऊस असाच राहिला, तर काही दिवसांत आणखी पिके हातची जाण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..Kharif Crop Loss: ओल्या आपत्तीतल्या कोरड्या घोषणा.जिल्ह्यात खरिपात सोयाबीन हे मुख्य पीक असून ४.३८ लाख हेक्टरवर यंदा पेरणी झाली आहे. पीक काढणीला येत असताना पावसाचा फटका बसला. कपाशी १.२९ लाख हेक्टर, मका ५२ हजार ८५६ हेक्टर, तूर ९४ हजार २३८ हेक्टर, मूग ५८०३ हेक्टर, उडीद ६५११ हेक्टर असे प्रमुख पिकांचे लागवड क्षेत्र असून या पिकांना पावसाने झोडपले. अतिवृष्टी, पुराने सोयाबीनसह कपाशी, मका, भाजीपाला क्षेत्राचे नुकसान केले. तुरीचे पीकही उधळले गेले..पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊससप्टेंबरमध्ये बुधवारपर्यंत (ता. २४) बुलडाण्यातील १३ पैकी ५ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. देऊळगावराजा व लोणार तालुक्यांत विक्रमी १२५ ते १४२ टक्के पाऊस झाला..Kharif Crop Loss : पावसाचा खंड; खरीप पेरा अडचणीत.यात -मलकापुरात सरासरी ५९६ च्या तुलनेत प्रत्यक्ष ७०२ मिमी (११७ टक्के).चिखलीत सरासरी ६६५ च्या तुलनेत प्रत्यक्ष ७२९ मिमी (११० टक्के).देऊळगावराजा तालुक्यात सरासरी ५८९ च्या तुलनेत प्रत्यक्ष ८४१ मिमी (१४२ टक्के),मेहकर सरासरी ६९६ च्या तुलनेत प्रत्यक्ष ९०६ मिमी (१३० टक्के)आणि लोणारमध्ये सरासरी ७४२ च्या तुलनेत प्रत्यक्ष ९४५ मिमी (१३१ टक्के) पाऊस पडला..राज्य सरकार असंवेदनशील आहे. निवडणुकीच्या काळात कर्जमाफी देऊ हे आश्वासन खोटे ठरलेले आहे. त्याची पूर्तता अद्याप झाली नाही. आता शेतकरी संकटात असताना शासन त्याकडे पाहायला तयार नाही. बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने निम्मा हंगाम बाधित आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करून तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकाराने २२१५ कोटींची मदत जाहीर केली. पण या तुटपुंज्या मदतीने काहीही होणार नाही. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणे हेच सद्य:स्थितीत आवश्यक आहे.- जयश्री शेळके, प्रदेश प्रवक्ता,शिवसेना (उबाठा), बुलडाणा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.