Agriculture Electricity : तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?

Crop Damage : ज्या शेतकऱ्‍यांकडे पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु कृषी पंपासाठी १८ तासाचे भारनियमन सूरु आहे.
Agriculture Electricity
Agriculture Electricity Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे कपाशी, तूर वाळून जात आहेत. ज्या शेतकऱ्‍यांकडे पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

परंतु कृषी पंपासाठी १८ तासाचे भारनियमन सूरु आहे. उरलेल्या सहा तासातही थ्री पेज लाइट एक तासही टिकत नाही, यामुळे दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यात यंदा पावसाअभावी खरिपातील पिकांची माती झाली आहे. मागील एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिपातील कपाशी, तूर यासारखी पिके उन्ह धरु लागली आहेत. अशावेळी पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी पिकांना पाणी देवून जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

परंतु सध्या कृषी पंपाच्या विजेचे १८ तास लोडशेडींग आहे. उरलेल्या सहा तासात किमान दहा-वीस वेळा थ्री पेज लाइट ट्रिप होत आहे. आलेली लाइट आवश्यक दाबाची नसल्यामुळे विद्युत मोटारी चालत नाहीत. परिणामी पाणी असूनही पिकांना ते देता येत नसल्याने शेतकरी महावितरणवर प्रचंड रोष व्यक्त करत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : कृषिपंपांना वीजपुरवठा होईना

दुसरीकडे महावितरण मात्र विजेची बचत करीत वरिष्ठांकडून बक्षीस मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्युत उपकेंद्रातून विजेची अधिकाधिक बचत कशी होईल, यासाठी तेथील कर्मचारी तत्पर असल्याचे दिसून येत आहे. यासाठी वीजकर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : विजेच्या लपंडावाने पिके सुकू लागली

शेतीपंपासाठी विजेचे भारनियमन करताना त्याचे वेळापत्रकही अडचणीच्या काळातील आहे. मध्यरात्री एक वाजता थ्रीपेज विज टाकली जाते. तीही सहा तासाऐवजी केवळ तीन ते चार तासच टिकते. या काळात विजेचा आवश्यक दाबही नसतो. यामुळे कृषीपंपासाठी दिल्या जाणाऱ्या विजेचा दर्जाही तपासण्याची वेळ आली आहे.

पावसाअभावी ओलावा गायब

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस नाही. परिणामी जमिनीतील ओलावा गायब झाला आहे. अशावेळी रब्बी पेरणीसाठी जमीन तयार केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली आहे. अशावेळी उपलब्ध पाण्याचा वापर करुन रब्बी पिकांच्या पेरणी करण्याचे नियोजन विजेअभावी विस्कळीत झाले आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात योग्य दाबाचा विज पुरवठा करुन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सध्या जमिनी कोरड्या पडल्याने कपाशी वाळत आहे. आमच्याकडे पाण्याची व्यवस्था असूनही वीज दोन तासही टिकत नाही. यामुळे पिकांना पाणी देता येत नाही.
- सुधाकर शिंदे, जोमेगाव, ता. लोहा जि. नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com