Crop Loan Rate : परभणी जिल्ह्यासाठी पीकनिहाय कर्जदर निश्चित

Crop Loan Update : हंगामी पिके, बागायती पिके, फळे, भाजीपाला पिकांसाठी प्रतिएकरी कर्जदर (स्केल ऑफ फायनान्स) तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक खेळत्या भांडवलासाठी कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत.
Crop Loan Update
Crop Loan UpdateAgrowon

Parbhani News : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) सुचनेनुसार परभणी जिल्ह्यात चालू (२०२४-२५) आर्थिक वर्षासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने केलेल्या शिफारशीनुसार हंगामी पिके, बागायती पिके, फळे, भाजीपाला पिकांसाठी प्रतिएकरी कर्जदर (स्केल ऑफ फायनान्स) तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक खेळत्या भांडवलासाठी कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत. यंदा सोयाबीन, कपाशी, तूर, ऊस, केळी, हळद आदी पिकांच्या कर्जदरात वाढ करण्यात आली आहे.

Crop Loan Update
Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

कृषी कर्ज नियोजन आराखड्यानुसार परभणी जिल्ह्यातील बँकांना यावर्षी खरीप आणि रब्बी हंगामात एकूण २ हजार २५२ कोटी ९९ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समिती आणि राज्य स्तरीय तांत्रिक समितीने शिफारस केलेल्या कर्जदरात समन्वय साधून चालू आर्थिक वर्षासाठी विविध पिकासाठी प्रतिएकरी कर्ज वाटप तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, रेशीम शेती, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, लाख शेती या शेतीपूरक व्यवसायासाठीच्या खेळते भांडवल कर्जाचे दर निश्चित केले. त्यास जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली.

Crop Loan Update
Crop Loan : पीककर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत

यंदा बागायती तसेच जिरायती कपाशी, तुरीच्या कर्जदरात २ हजार रुपये, ठिबक सिंचनावरील कपाशीच्या कर्जदरात ३ हजार रुपये, मुगाच्या कर्जदरात १ हजार उडदाच्या कर्जदरात १ हजार ४०० रुपये वाढ करण्यात आली आहे.

सोयाबीनच्या कर्जदरात ३ हजार रुपये, हळदीच्या कर्जदरात ५ हजार रुपये, उसाच्या कर्जदरात ५ ते ६ हजार रुपयांनी, केळीच्या कर्जदरात ६ ते ९ हजार रुपये, हळदीच्या कर्जदरात ५ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांनी दिली.

२०२४-२५ वर्षासाठी पीकनिहाय एकरी कर्जदर (कंसात रुपये)

बारमाही बागायती पिके ः सुरू ऊस (५७०००), पूर्व हंगामी ऊस (५७०००), आडसाली ऊस (६००००), केळी (५००००), केळी टिश्यु कल्चर (६५०००), हळद (५२०००), बटाटा (३२०००).

हंगामी बागायती पिके ः कापूस बागायती (३३०००), बी.टी. कापूस (३५०००), कापूस ठिबक सिंचन (३५०००), उन्हाळी भुईमूग (२२०००).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com