Crop Experiment Honors : कृषी पुरस्कारात पीकनिहाय प्रयोगशीलतेचा व्हावा सन्मान

Commissionerate of Agriculture : एका पिकात मास्टर असलेल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना बसत असल्याने त्यांच्याकरिता स्वतंत्र पुरस्काराची घोषणा करावी, असा विचार कृषी आयुक्‍तालय स्तरावरील बैठकीत राज्यातील विभागीय सहसंचालकांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : कृषी विभागाच्या पुरस्कारासाठी पात्र ठरविण्याकरिता तत्कालीन कृषी आयुक्‍त धीरजकुमार यांच्या कार्यकाळात बदल करण्यात आले. विविध बाबींची पूर्तता केल्यानंतर ठरावीक गुण देण्याची पद्धती लागू करण्यात आली. मात्र याचा फटका एका पिकात मास्टर असलेल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना बसत असल्याने त्यांच्याकरिता स्वतंत्र पुरस्काराची घोषणा करावी, असा विचार कृषी आयुक्‍तालयस्तरावरील बैठकीत राज्यातील विभागीय सहसंचालकांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

कृषी पुरस्काराकरीता सुरुवातीच्या काळात विभागीय सहसंचालकस्तरावरच निवडीची प्रक्रिया राबविली जात होती. फाइलवर एक, दोन, तीन असा क्रमांक नोंदविला जात या क्रमवारीनुसार प्रस्ताव आयुक्‍तालयाला पाठविले जात होत. त्याच क्रमांकानुसार पुरस्कारार्थींची निवड करण्याला प्राधान्य दिले जात होते.

Agriculture
Agriculture Technology : अचुक अंतरावर, खोलीवर पेरणीसाठी यंत्रे

यात पारदर्शकतेचा अभाव असल्याने तत्कालीन कृषी आयुक्‍त धीरज कुमार यांनी विविध बाबींसाठी गुण देण्याची पद्धती निश्‍चित केली. त्यानुसार आता पुरस्कारासाठी पात्र होण्याकरिता संबंधित शेतकऱ्याकडे बायोगॅस, ठिबक आहे का, त्याने किती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले; त्याविषयी वृत्तपत्रात किती बातम्या छापून आल्या, असे अनेक मुद्दे असून या प्रत्येक बाबीला ठरावीक गुण निश्‍चित करण्यात आले आहेत.

Agriculture
Mulberry Farming : तुती बागेमध्ये आच्छादन महत्त्वाचे...

यातील १०० पैकी ८५ गुण देण्याचे अधिकार विभागीय कृषी सहसंचालकस्तरावर आहेत, तर १५ गुण हे कृषी आयुक्‍तालयस्तरावर निश्‍चित होतात. परिणामी आता निकष पूर्ण करणाऱ्यांचीच पुरस्काराकरिता निवड होत असल्याने गैरप्रकार नियंत्रणात आले आहेत. मात्र राज्यात काही शेतकऱ्यांनी एकाच पिकात हुकूमत गाजविली आहे. त्यांनाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. परंतु त्यांच्याद्वारे इतर निकषांची पूर्तता होत नसल्याने त्यांना सन्मानापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांकरिता त्या पिकातील भूषण असा पुरस्कार देत सन्मान व्हावा, अशी भूमिका विभागीय कृषी सहसंचालकांनी मांडली आहे.

द्राक्ष, डाळिंब, कपाशी, तूर, हरभरा अशा विविध पिकांतील मास्टर शेतकऱ्यांसाठी त्या पिकातील भूषण असा पुरस्कार देत सन्मान होण्याची भूमिका राज्यातील अनेक विभागीय सहसंचालकांनी बैठकीत मांडली. द्राक्ष भूषण, कपाशी भूषण, तूर, हरभरा भूषण याप्रमाणे त्यांना सन्मानित केले पाहिजे.
किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com