Onion Production : कांदा उत्पादन वाढीसाठी पीक संरक्षण गरजेचे

Crop Protection : सततचे ढगाळ वातावरण आणि वाढती आर्द्रता यामुळे कांदा पिकामध्ये विविध रोग आणि किडींचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो.
Onion Crop
Onion Crop Agrowon
Published on
Updated on

Nashik News : सततचे ढगाळ वातावरण आणि वाढती आर्द्रता यामुळे कांदा पिकामध्ये विविध रोग आणि किडींचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. वेळेवर उपाययोजना न केल्यामुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आढळून येत असल्याचे मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ पवन चौधरी यांनी सांगितले.

‘सकाळ अॅग्रोवन’ आणि ‘पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि.’ यांच्यातर्फे जळगाव नेऊर (ता. येवला) येथे दर्जेदार कांदा पीक तंत्रज्ञान यावरील चर्चासत्रात बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रयोगशील शेतकरी यादवराव झांबरे, प्रभाकर घुले, पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि.चे कृषी विभाग मुख्य विक्री व्यवस्थापक अरविंद सुळे, विभागीय व्यवस्थापक रोहित शिंदे, मंगेश पगार, अॅग्रोवन वितरण विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक महेश बेले यांसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Onion Crop
Onion Cultivation : खानदेशात आगाप कांदा लागवडीला वेग

पुढे बोलताना ते म्हणाले, की नाशिक जिल्ह्यातील अनुकूल वातावरणामुळे कांदा खरीप (पोळ), रांगडा व रब्बी या तीनही हंगामांत घेतला जातो असे असले तरीही कांदा हे मुख्यतः हिवाळी हंगामातील पीक असल्याने रब्बी कांद्याची उत्पादकता अधिक असते.

दर्जेदार कांदा पीक तंत्रज्ञानाची माहिती देताना त्यांनी हवामान, जमिनीची निवड, पूर्वमशागत, वाणांची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन आणि पुनर्लागवड, खत व्यवस्थापन, तणनियंत्रण, पाणी व्यवस्थापनामध्ये कांदा पिकाच्या पाण्याच्या पाळ्या हे पिकाची अवस्था, लागवडीचा हंगाम, जमिनीचा मगदूर या बाबींवर अवलंबून असतो.

Onion Crop
Onion Cultivation : ओतूर परिसरात कांदा लागवडीला वेग

पाणी देताना वाफ्यात किंवा सरीत पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. जमिनीत वाफसा कायम असणे आवश्यक असते. पाण्याचा जास्त ताण बसल्यास कांदा पोसत नाही. कमी पाणी आणि कमी खर्चात भरघोस उत्पादनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.

कांद्याची काढणी आणि साठवणूक साधारणतः ४० ते ५० टक्के माना पडू लागल्यानंतर कांदा काढणीस तयार होतो. रब्बी हंगामात ही लक्षणे ठळकपणे दिसतात. अरविंद सुळे यांनी पितांबरी कंपनी उत्पादनविषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी जालिंदर बाबूराव रसाळ यांनी सहकार्य लाभले.

...यांचा या वेळी झाला सन्मान

किरण शरदराव गायकवाड (कुसूर), पंकज साहेबराव सैद पाटील (खैरगव्हाण), यादवराव कोंडाजी झांबरे (शेवगे), संदीप भाऊसाहेब गायकवाड (खिर्डी गणेश)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com