Pik Vima: १ रुपयात पीक विमा बंद; लाडक्या बहीणींना पैसे देण्यासाठी सरकारचा निर्णय

Maharashtra Cabinet Decision: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली १ रुपयात पीकविमा योजना बंद केली असून आता शेतकऱ्यांना विम्याचा नियमित हप्ता भरावा लागणार आहे. सरकारचा हा निर्णय ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी निधी वळवण्यासाठी घेतल्याची टीका होत आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरिप पिकांचा विमा घेताना २ टक्के हप्ता भरावा लागणार आहे. तर रब्बी पिकांसाठी विमा घेताना दीड टक्का हप्ता भरावा लागेल. तसेच नगदी पिकांसाठी ५ टक्के हप्ता शेतकऱ्यांकडून घेतला जाणार आहे. यामुळे राज्य सरकारचे जवळपास दीड ते २ हजार कोटी रुपये वाचतील.

मंगळवारी (ता.२९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात खरिप हंगाम २०२३ पासून शेतकऱ्यांसाठी १ रुपयांत पीक विमा योजना सुरु करण्यात आली होती. शेतकऱ्यांना विमा अर्ज भरताना केवळ १ रुपया भरावा लागत होता. उरलेला शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा विमा हप्ता राज्य सरकार भरत होते. त्यामुळे राज्य सरकारवर पीक विमा योजनेत अतिरिक्त भार आला होता. याची जाणीव सरकारला तिजोरीवर इतर योजनांचा भार पडल्यानंतर जास्त प्रमाणात झाली. 

Crop Insurance
New Crop Insurance: राज्य सरकारचा निर्णय; पीक विमा योजनेत मोठे बदल

लाडकी बहीण सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने अनेक शेती योजनांवरचा खर्च कमी केला. आर्थिक क्षमता नसतानाही ३६ हजार कोटींचा आर्थिक भार असलेली लाडकी बहीण योजना सुरु केल्यामुळे सरकार हा खर्च भागवण्यासाठी इतर कोणत्या योजनांना कात्री लावता येईल का याचा विचार करत होते. याचाच एक भाग म्हणून सरकारने पीक विमा योजनेवरचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. 

Crop Insurance
New Crop Insurance: सुधारित पीकविमा योजनेला मान्यता; केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार 

सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरु केल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा जवळपास दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता भरावा लागत होता. आता सरकारने १ रुपयात विमा योजना बंद केल्यामुळे सरकारचा हा खर्च वाचणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हिस्स्याच्या विमा हप्त्यापोटी देत असलेले जवळपास दीड ते दोन हजार कोटी रुपये यापुढे देण्याची गरज नाही. म्हणजेच सरकारचा पीक विम्यावरील खर्च कमी होणार आहे. हा पैसा सरकार लाडक्या बहीणींचा हप्ता देण्यासाठी वापरणार आहे. 

मुळात शेतकऱ्यांनी सरकारकडे एक रुपयात पीकविमा योजना सुरु करण्याची मागणीच केली नव्हती. सरकारने लोकप्रिय घोषणांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतला होता. आता निवडणुकीत लाडक्या बहीणींनी साथ दिल्याने शेतकऱ्यांना दूर सारून सरकार लाडक्या बहीणींची काळजी घेत असल्याची टिका शेतकरी करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com