Crop Insurance Complaints: पीक विमा कंपन्यांबद्दलच्या तक्रारी येत्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चेसाठी घेतल्या आहेत. मागील उपसमितीच्या बैठकीत आम्ही मोठ्या प्रमाणात तक्रारी सोडवल्या. विमा कंपन्यांचे अधिकारी आले होते. त्यांना आम्ही दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे दिले आहेत. पीक विम्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. याची काळजी राज्य सरकार घेतली आहे, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली..ते आज (दि. १४ नोव्हेंबर) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतरस्ते करण्यावर सरकारचा अधिक भर आहे. सिमेंट रस्ते केले जाणार नाहीत. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेमध्ये आता प्रत्येक विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीवर आमदार हा अध्यक्ष आहे. त्यासोबतच एक सह-अध्यक्ष असेल. राज्यातील १२५ विधानसभा क्षेत्रस्तरावर सह-अध्यक्ष दिले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. .Kharif Crop Insurance: हिंगोलीत खरीप पीकविम्याचे २० हजार ९६८ अर्ज रिव्हर्ट.आमदारांना अशी विनंती केली आहे की त्यांनी तातडीने बैठका घेऊन जास्तीत जास्त शेतरस्ते करुन घ्यायचे आहेत. तेथील शेतमजुराला काम दिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले..Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! विमा कंपनीने नाकारलेले 'रिव्हर्ट' अर्ज पात्र ठरणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.संत्रा उत्पादक शेतकरी पीक नष्ट झाल्याने चिंतेत आहेत. यावर बोलताना बावनकुळेंनी सांगितले की, दुष्काळ परिस्थितीत पीक वाचवण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत बोअरवेलवरील बंदी उठवली आहे. जिथे फळबागा सुकल्या आहेत तेथे त्यांना बोअरवेलसाठी मुभा दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. .दुष्काळी परिस्थितीत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'ला अधिक गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत सह-अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना गती मिळण्यास मदत होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.