Rabi Season: रब्बी हंगामात झालेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप आणि चालू रब्बी हंगामातील विमा दावेही प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याशिवाय मका खरेदीची थकीत रक्कमही तातडीने अदा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली..जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप आणि चालू रब्बी हंगामातील विमा दावे निकाली काढून विमा रक्कम तातडीने खात्यात जमा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे..Grape Farmers Demand: सोलापूर-सांगली सीमेवर द्राक्षासाठी ‘कंटेनर डेपो’ उभारा .याशिवाय आदिवासी विकास महामंडळामार्फत नाशिक जिल्ह्यातील विविध मका खरेदी केंद्रांवर मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांची थकीत रक्कमही अद्याप अदा करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे..Farmers Demand: लोखंडी बैलगाडीला ७० टक्के अनुदान देण्याची मागणी.दरम्यान, खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर बियाणे आणि खत खरेदीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई, पीकविमा आणि मका खरेदीची थकीत रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ‘‘शेतकरी आधीच नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आहे. .शासनाने नुकसान भरपाई, पीकविमा आणि मका खरेदीची थकीत रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,’’ असा इशारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, जिल्हा संघटक विवेक सोनवणे, कळवण तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, गोकुळ वाघ, सतीश वाघ, प्रवीण सोनवणे, महेंद्र सोनवणे, भाऊसाहेब बेडीस, दिनकर सावकार, कचरू बागुल, भाऊसाहेब भंडारी, सोपान कडलक, विजय काकुळते, संतोष जाधव आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.