Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई ३७७७ कोटींवर; शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ४९८ कोटी रुपये जमा होणार

Insurance Payout: खरिप २०२४ मध्ये पीकविमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ३७७७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी ३२७९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरित ४९८ कोटींचे वाटप सुरू आहे.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon
Published on
Updated on

Pune News: खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ७७७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. एकूण चार ट्रीगरमधून ही भरपाई मंजूर झाली. मंजूर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी ४९८ कोटी रुपये जमा होणार आहेत. लवकरच ही भरपाई देखील खात्यात जमा होईल अशी माहीती कृषी विभागाने दिली.

खरिप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना एकूण ४ ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. यापैकी राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ताच विमा कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई खात्यात जमा होत आहे. राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळेल.

चार ट्रीगरमधून शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ७७७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील विमा भरपाईची स्थिती ३ हजार २७९ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर आणखी ४९८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे.

Crop Damage Compensation
Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांना ३७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर

लातूर विभागातील विमा भरपाईचे चित्र

जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक

परभणी…४२९.८५…४०३.७७…२६.०७

नांदेड…३६१.४४…२५४.२७…१०७.१६

धाराशीव…२१९.९२…२१८.०२…१.९०

लातूर…२४६.६१…२२७.४०…१९.२०

हिंगोली…१७८.१९…१७२.७५…५.४३

छत्रपती संभाजीनगर विभागातील विमा भरपाईची स्थिती

जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक

बीड…२८२.६२…२८२.५३…०.९

जालना…२६३.४०…१६२.४६…१००.९४

छत्रपती संभाजीनगर…१२९.७९…१२९.२६…०.५२

Crop Damage Compensation
Farmer Compensation: पूर्व मोसमी पाऊस नुकसानीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करा : किसान सभा

अमरावती विभागातील विमा भरपाईची परिस्थिती

जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक

बुलडाणा…३१८.५६…३१६.१४…२.४२

अमरावती…६१.७८…५०.४६…११.३१

अकोला…९०.४९…७९.५३…१०.९५

वाशिम…८८.४५…८८.४५…०

यवतमाळ…१७५.८७…१५२.६९…२३.१८

नागपूर विभागातील विमा भरपाईची स्थिती

जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक

वर्धा…१२६.९१…१२५.५७…१.३४

नागपूर…६६.५९...६३.७३…२.८५

भंडारा…०.५२…०.४८…०.४

गोंदीया…०.३४…०.३४…०.३३

चंद्रपूर…४२.६९…३५.९४…६.७४

गडचिरोली…५.४७…३.०६…२.४०

नाशिक विभागातील विमा भरपाईची स्थिती

जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक

नाशिक…११५…७९…३६

धुळे…२८.७६…२२.७३…६.०३

नंदुरबार…२३.८६…२०.८७…३

जळगाव…५५.३३…५१.६८…३.६४

पुणे विभागातील विमा भरपाईची स्थिती

जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक

अहिल्यानगर…१७१.३६…१४४.१४…२७.२१

पुणे…३.७६…३.३७…०.३८

सोलापूर…२५७.४०…१७४.२२…८३.१८

कोल्हापूर विभागातील विमा भरपाईची स्थिती

जिल्हा…मंजूर भरपाई…जमा भरपाई…शिल्लक

सातारा…४.४०…०.५१…३.८८

सांगली…७.३७…७.३३…०.४

कोल्हापूर…१०.५९…८.०१…२.५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com