Chandrashekhar Bawankule On Crop Damage: पीक नुकसानीचे अचूक पंचनामे झाले तर कुठेही समस्या येणार नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल. पंचनामे करताना शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन खरीखरी वस्तुस्थिती कळेल. त्यातून आणेवारी निघेल. आणेवारी निघाली की दुष्काळाची मदत मिळण्यासाठी फायदा होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) दिली..राज्यात सध्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्यांनी आपण स्वतः पंचनामे पाहण्यासाठी बांधावर जाणार असल्याचे म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, उद्या मी छत्रपती संभाजीनगर, जालना येथे जाणार आहे. त्यानंतर मी अकोला, बुलढाणा येथे पाहणीसाठी जाणार आहे. पंचनाम्यासाठी नेमके पथक बांधावर आहे का? हे पाहिले जाईल. महसूल. ग्रामविकास, कृषी विभाग मिळून पंचनामा करतात. यामुळे अचूक पंचनामे झाले पाहिजेत. प्रशासकीय यंत्रणा गावात असली पाहिजे. .Maharashtra Drought: शेतीकर्ज वसुलीला स्थगिती, सरकारचा निर्णय, पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबतही बँकांना महत्त्वाचे निर्देश.'बांधावर रॅम्प, अधिकाऱ्यांवर कारवाई होणार'सध्या राज्यातील आमदार, मंत्री बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करत आहे. काही ठिकाणी मंत्र्यांना शेतात उतरण्यासाठी रॅम्प केल्याचे दिसून आले. यावरुन मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. अशापद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा करणे योग्य नाही. मंत्री आले की बांधावर रॅम्प करायचे आणि शेतकऱ्याच्या वरुन उडी मारायची का?. मी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. .Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळांची प्रत्यक्ष पाहणी; तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश.'अवैध सावकारी दिसली तर कंबरडे मोडून काढू'बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे लागायचे नाही. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत. पतसंस्थेपासून राष्ट्रीयीकृत बँकेपर्यंत, खासगी बँकेपासून जिल्हा बँकेपर्यंत कोणतीही बँक वसुलीसाठी जाणार नाही. अवैध सावकारी दिसली तर कंबरडे मोडून काढू. जो शेतकऱ्याला जीवन संपवण्याकडे नेणारा वर्ग आहे त्यांना आम्ही शोधून काढू. सावकाराकडून जर फसवणूक झाली तर शेतकऱ्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले..दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणीही अडचणीत आणायचे नाही. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. यावर सरकार विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. .दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीची नुकतीच बैठक झाली. याबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, १५ ते २० तालुके असे आहेत. ते ट्रिगर १ मध्ये आलेले नाहीत. पण त्यांची आणेवारी काढली तर किंवा त्यांचा पंचनामा केला तर वरून पीक हिरवे दिसते. पण आत काहीच नाही, अशी परिस्थिती आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोलीत जाऊन आलो. अशाही तालुक्यांना न्याय द्यायचा आहे. आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहोत..पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आवाडे यांनी भेट घेतली. त्यांनी दोन तालुके सुचवले आहेत. या तालुक्यांत टप्प्याटप्प्याने दुष्काळ परिस्थितीबाबत सर्वेक्षण होईल, असे बावनकुळे यांनी नमूद केले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.