
Nagpur News : विभागातील सहा जिल्ह्यात गारपीट (Hailstorm), अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या नुकसानीचे प्राथमिक सर्व्हेक्षण (Crop Damage Survey) कृषी विभागाकडून (Agriculture Department) पूर्णत्वास गेले आहे.
त्यानुसार सहा जिल्ह्यातील सुमारे ३०७ गावांमध्ये ७ हजार ९६१ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून तसा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ७ हजार १८७ हेक्टरनुकसान एकट्या नागपूर जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहे.
नागपूर विभागात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर तसेच वर्धा या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो.
शनिवारी (ता.१८) व रविवारी (ता.१९) या विभागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गहू आडवा झाला, तर आंबिया बहरातील फळांचेही नुकसान झाले.
नागपूरच्या काटोल, सावनेर तालुक्यांमध्ये संत्रा बागायतदार या नुकसानीमुळे हवालदील झाले आहेत. पेन्शनच्या मागणीसाठी कृषी विभागाचे कर्मचारी संपावर असतानाही त्यांनी या नुकसानीची दखल घेत सर्व्हेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया पार पाडली.
त्यानुसार नागपूर जिल्ह्यात १३१ गावांमध्ये ७ हजार १८७ हेक्टरचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. गडचिरोलीच्या ८८ गावांत २४६ हेक्टर, भंडारा ४२ गावांत २२७ हेक्टर, गोंदिया ७२ गावांत ८० हेक्टर, तर चंद्रपूर जिल्ह्यातील १४ गावात २२० हेक्टरचे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून आता शेतकऱ्यांच्या नजरा भरपाईकडे खिळल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.