Crop Damage Compensation: भंडारा : मागील खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली, शेतांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. मात्र एवढे मोठे नुकसान होऊनही प्रशासनाने तयार केलेल्या नुकसानभरपाई यादीत प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांची नावेच नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे..भंडारा जिल्हातील विविध भागांत अतिवृष्टीने थैमान घातले होते. विशेषतः मोहाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. अनेक गावांमध्ये संपूर्ण शेत पाण्याखाली गेली, भाताचे पीक आडवे पडले तर काही ठिकाणी माती वाहून गेल्याने जमीनही निकृष्ट झाली. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून फोटोही काढले; मात्र अंतिम भरपाई यादी जाहीर होताच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला..Wildlife Crop Damage: शेतात हत्तींचा धुडगूस; पिकांचे मोठे नुकसान.नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत नसताना, काही ठिकाणी अजिबात नुकसान न झालेल्यांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत असून, आधीच आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी अधिक अडचणीत आले आहेत..Crop Damage Compensation: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे.‘‘अधिकारी आले, पाहणी केली, फोटो काढले; पण शेवटी आमचे नावच यादीत नाही. संपूर्ण शेत पाण्याखाली गेले तरी मदत मिळाली नाही, हा अन्याय आहे,’’ अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काहींनी तर पंचनामे केवळ कागदापुरतेच झाले असून प्रत्यक्षात वास्तविक नुकसान डावलले गेल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाकडून मात्र सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्याचे सांगितले जात असले तरी गावागावांतून तक्रारींचा पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर भरपाई यादीची नव्याने तपासणी करून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि पंचनामे प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.