Mumbai News: राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये १०८ तालुक्यांतील ८ लाख ४४ हजार ३४६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. २० ऑगस्ट रोजी हीच आकडेवारी ८ लाख ५१ हजार ११० हेक्टर होती. कृषी विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक अंदाजात ७ हजार हेक्टरने क्षेत्र घटले आहे. .राज्यात गुरुवारी (ता. २१) पाऊस कमी झाला असून अनेक ठिकाणचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे पंचनामे होणे अपेक्षित होते, मात्र कृषी विभागांच्या जाहीर केलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात तफावत आली आहे. .Maharashtra Crop Loss: राज्यात ५ लाख ४९ हजार हेक्टरवरील शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका; शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट.राज्यात १५ ऑगस्टपासून झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे २० जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या अंदाजानुसार, ८ लाख ५१ हजार ११० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नांदेडमध्ये २ लाख ८५ हजार, ५४३, बुलडाण्यात ८९ हजार ७५८, अमरावतीमध्ये २३ हजार ५८३, वाशीममध्ये १ लाख ५१ हजार ७२३, यवतमाळमध्ये ९२ हजार ७२३, अकोल्यात ४३ हजार ७०३.Heavy Rain Crop Loss : राज्यात १० लाख एकरवरील पीके पाण्याखाली; २ दिवसांत नुकसानीचे पंचनामे होणार: अर्थमंत्री अजित पवार.वर्ध्यात ७७६, सोलापुरात ४१ हजार ४७२, अहिल्यानगर येथे ३ हेक्टर, सांगलीत १९९८, धुळ्यात २३, जळगावमध्ये १२,३३७, हिंगोलीगमध्ये ४० हजार, परभणीत २० हजार २२५, छ. संभाजीनगरमध्ये २०७४, जालन्यात ५१७८, बीडमध्ये १९२५, धराशिवमध्ये २८ हजार ५०० आणि लातूरमध्ये १० हेक्टरवर नुकसान झाले आहे. .पश्चिम महाराष्ट्रात पूर, तरीही अंदाज नाहीराज्यात सर्वदूर पाऊस झाला असून नुकसान झाले आहे. मात्र कृषी विभागाच्या नुकसानीच्या अंदाजात सोलापूर, सांगली वगळता अन्य जिल्ह्यांतील नुकसानीचा प्राथमिक अंदाज अद्याप जाहीर झालेला नाही. पंचगंगा, कृष्णा या मोठ्या नद्यांसह लहान-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे. उसासह भुईमूग, भात, नाचणी आणि मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.