Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने ६ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर दरम्यान मागणीनुसार वेगवेगळे शासन निर्णय काढले. १८ सप्टेंबरला परभणी व नांदेड जिल्ह्यातील ऑगस्टमधील नुकसान भरपाईसाठी सुमारे ६३० कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली. .मात्र, ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या इतर चार जिल्ह्यांच्या निधी मागणीला मंजुरी बाकी आहे.शिवाय छत्रपती संभाजीनगर व जालन्यातील नुकसानीचा यामध्ये समावेशच नसल्याची स्थिती आहे.मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी या पाच जिल्ह्यांतील सुमारे एक लाख ११ हजार ११५ शेतकऱ्यांच्या शेती पीक नुकसान भरपाईसाठी अनुक्रमे १९ जुलै, १९ ऑगस्ट व ११ सप्टेंबर रोजी सुमारे १४ कोटी ६० लाख ७४ हजार ९३५ रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. .Farmer Compensation Delay : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा प्रस्ताव रखडला.६ ऑगस्ट व १७ तसेच १८ सप्टेंबर रोजी शासन निर्णयान्वये मागणीनुसार सुमारे १४ कोटी ६० लाख ७४ हजार रुपयांच्या निधीला शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, की जुलै मधील नुकसानीसाठी हिंगोली परभणी या दोन जिल्ह्यातील ८७ हजार ५१२ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी चार व ११ तसेच १७ सप्टेंबर रोजी सुमारे ५१ कोटी ८० लाख २४ हजार १७० रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली होती १२ व १८ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयान्वये दोन्ही जिल्ह्यांसाठी सुमारे ५१ कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली..ऑगस्ट २०२५ मधील परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर व धाराशिव या सहा जिल्ह्यांतील १९ लाख ६० हजार ७९३ शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी १६ व १८ सप्टेंबर रोजी १३५२ कोटी ३७ लाख ५५ हजार २७५ रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. .Farmer Compensation: पंचनाम्यातून नुकसानग्रस्त वंचित राहू नयेत .त्यापैकी परभणी जिल्ह्यासाठी ७६ कोटी ९१ लाख ७ हजार व नांदेड जिल्ह्यासाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये मिळून दोन जिल्ह्यांसाठी सुमारे ६३० कोटी ३९ लाख ६९ हजार रुपये निधीला शासनाकडून १८ सप्टेंबर रोजी च्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली..जिल्हानिहाय नुकसानग्रस्त शेतकरी संख्या जूनमधील मागणीनुसार नुकसानग्रस्त शेतकरी संख्याहिंगोली ः३२४७ नांदेड ः ७४९८ बीड ः १०३ धाराशिव ः २६६ परभणी ः १.Farmer Compensation Scam : अनुदानाचा मलिदा लाटणाऱ्यांवर गुन्हे.जुलैमधील मागणीनुसार नुकसानग्रस्त शेतकरी संख्याहिंगोली ः ३९५ परभणी ः ८७११७ .ऑगस्टमधील मागणीनुसार नुकसानग्रस्त शेतकरी संख्यापरभणी ः १५१४१२ नांदेड ः ७७४३१३ हिंगोली ः ३०४८२९ बीड ः ११४७७३ लातूर ः ३८०५११धाराशिव ः २३४९५५ (जुलै व ऑगस्ट नुकसानग्रस्त शेतकरी).ऑगस्टमधील पीक नुकसानीसाठी प्रलंबित जिल्ह्यांची निधी मागणी (कोटी रुपये)जिल्हा मागणी केलेला निधी (रु.)हिंगोली २३१ कोटी २७ लाख ९२ हजार ३५ रुपयेबीड ५६ कोटी ७३ लाख ९० हजार ३०० रुपयेलातूर २४४ कोटी ३५ लाख ३६ हजार ७०० रुपयेधाराशिव १८९ कोटी ६० लाख ६७ हजार ५५ रुपये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.