Yogesh Kumbhejkar : धानपट्ट्यात समृद्धीसाठी पीक फेरपालट गरजेचा

Agriculture Update : ‘‘भातपट्टयात समृद्धीसाठी पीक फेरपालट हा सक्षम पर्याय ठरेल. त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी कृषी महोत्सवासारखे उपक्रम पूरक ठरतात. यातून नव तंत्रज्ञान आणि पिकांविषयी जाणता येत आहे.
Yogesh Kumbhejkar
Yogesh KumbhejkarAgrowon

Bhandara News : ‘‘भातपट्टयात समृद्धीसाठी पीक फेरपालट हा सक्षम पर्याय ठरेल. त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी कृषी महोत्सवासारखे उपक्रम पूरक ठरतात. यातून नव तंत्रज्ञान आणि पिकांविषयी जाणता येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा ठिकाणी भेट देण्यावर भर देण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

कृषी विभाग, आत्मातर्फे आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते मंगळवारी (ता. ३०) बोलत होते. अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, विभागीय कृषी सहसंचालक मिलिंद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संगीता माने, ‘केव्हीके’च्या प्रमुख उषा डोंगरवार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यु. डी. चिखले उपस्थित होते.

Yogesh Kumbhejkar
Agriculture Changes : जागतिक व्यापारानुसार शेतीत करा बदल

वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रयत्नातून स्ट्रॉबेरी लागवड क्षेत्र वाढीस लागले आहे. हे पीक चांगले उत्पन्नक्षम ठरत आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकरी महेश पाटील यांचा खास स्टॉल या महोत्सवात लावला होता.

Yogesh Kumbhejkar
Climate Change : वातावरण बदलाचे शेतीवरील परिणाम

प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान

जागेश्‍वर वंजारी (परसोडी), दादाभाई वाहणे, माधुरी भुते (डव्हा), सुमित्रा भुते, सुधाकर बांते, सुरेश ईश्‍वरकर, सुनंदा बांते, सेवक झंझाड, चमडू पेंदाम, जयकिसन हलमारे, रविशंकर रहांगडाले, वामन शिंगनजुडे, श्‍याम देशमुख, पपीता ढोक, मुरलीधर वंजारी, किशोर वराडे, नरेंद्र आयतुलवार, लहू पिल्लेवान, अनिल किरणापूरे, ताराचंद लंजे, योगेश्‍वर हुमे, वंदना वैद्य, स्वप्नील नंदनवार, चंद्रशेखर टेंभुर्णे, मोरेश्‍वर सिंगनजुडे, संदेश पंधरे,

विनोद सेलोकर, हरिदास करकाडे, दुर्गेश कांबळे, भोलेनाथ बुराडे, रवींद्र किरमीरे, तेजराम बगमारे, सुखदेव पटले, पांडुरंग सारवे, ताराचंद लंजे, सुखदेव उईके, कैलास उईके, भिवाकर गोविंदवार, रावजी वरंबे, पंढरी रामटेके, युवराज डहारे, भीमराव रामटेके, खुशाल पाकमोडे, गणेश कापसे, मोतीराम बावनकर, विनोद साठवणे, अरुण साठवणे या शेतकऱ्यांचा सन्मान झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com