CRZ Work : ‘सीआरझेड’चे उल्लंघन करणाऱ्यांना दणका

CRZ Work Update : सीआरझेड’चे उल्लंघन करून समुद्र व खाडीकिनारी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अलिबागच्या तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दणका दिला आहे.
CRZ Work
CRZ WorkAgrowon

Alibaug News : ‘सीआरझेड’चे उल्लंघन करून समुद्र व खाडीकिनारी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अलिबागच्या तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दणका दिला आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार सीआरझेड व कांदळवन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे.

या कारवाईने बंगलेधारकांची वकिलांकडे धावाधाव सुरू झाली आहे. नुकतीच अलिबागचे उपविभागीय अधिकारी ढगे यांची बदली झाली आहे. जाता जाता त्यांनी ही कारवाई केल्याने बंगलेधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

अलिबाग व मुरूडमधील निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी धनदांडग्यांकडून मांडव्यापासून किहीम, आवास, सासवणे, थळ, रेवदंडा, नागाव अशा अनेक ठिकाणी मोठमोठे बंगले बांधण्यात आले आहेत.

स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून सरकारचे नियम धाब्यावर बसवून या धनदांडग्यांनी बांधकाम केले आहे. यात सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील सात जण; तसेच कांदळवनाचे उल्लंघन करून अलिबाग व मुरूडमधील सहा जणांविरोधात तक्रार करण्यात आली.

CRZ Work
Fishing Season : मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्र किनारी विसावल्या

या तक्रारीनंतर अलिबागच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, नगर रचना व नियोजन विभागामार्फत प्राप्त अहवालानुसार, बेकायदा बांधकाम केल्याचे उघड झाले आहे.

नागावचे माजी सरपंच अडचणीत

नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्याविरोधात दोन महिन्यांपूर्वी खंडणीप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणानंतर त्यांच्याविरोधात सीआरझेडचे उल्लंघनप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

अलिबागचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे. सीआरझेडचे उल्लंघन करत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्याविरोधात महसूल प्रशासनाने कारवाई केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नंदकुमार मयेकर अडचणीत आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com