Public Protest: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील भोंदू बाबा अशोक खरात आणि त्याला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. ६) बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, शिरसाळा या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे निदर्शने करण्यात आली..राज्यात तंत्र-मंत्राच्या नावाखाली नागरिक आणि विशेषतः महिलांचे शोषण वाढले आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तींनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याऐवजी अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याने अशा भोंदूंना प्रतिष्ठा मिळत आहे आणि सर्वसामान्यांची लूट होत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन मागण्या करण्यात आल्या. .Farmer Protest: आंबा, काजूची भरपाईची घोषणा न झाल्यास आंदोलन.या आंदोलनात बीड जिल्ह्यातील माकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने या जनभावनेची तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बीड जिल्हा सेक्रेटरी कॉ. अजय बुरांडे यांनी दिला..Farmers Protest: मागण्याविषयी त्रस्त शेतकरी पुन्हा उतरले साडेपाच तास पाण्यात....या आहेत मागण्याखरात व त्याच्या साथीदारांची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी वापरावी. या प्रकरणात सामील आमदारांची नावे जनतेसमोर जाहीर करावीत. शोषणाला बळी महिलांचे समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह व्हिडिओ तातडीने हटवून त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करावे. .या भोंदू बाबाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करावी. राज्यातील सर्व भोंदू बाबांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्यव्यापी विशेष शोध मोहीम राबवावी. प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय त्वरित अमलात आणावा. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून त्याची कडक अंमलबजावणी करावी.समाजमाध्यमांवरून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणावी. त्यासाठी स्वतंत्र नियमन यंत्रणा तयार करावी. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.