Cotton Processing Industry: कापसाची कमी आवक, बाजारातील अस्थिरता आणि विस्कळीत पुरवठा यामुळे खानदेशातील कापूसगाठी तयार करणाऱ्या जिनिंग-प्रेसिंग कारखान्यांची धडधड यंदा सुमारे महिनाभर आधीच थांबली आहे. परिणामी, कापूस प्रक्रिया उद्योगावर मोठा परिणाम झाला असून, कापूसगाठींच्या उत्पादनातही घट झाली आहे..यंदा भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला गती दिल्याने बाजारात काही काळ स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे खासगी कारखानदार आणि खरेदीदारांना अपेक्षित प्रमाणात कापूस उपलब्ध झाला नाही. खानदेशात दिवाळीनंतर जिनिंग-प्रेसिंग कारखाने सुरू होतात आणि त्यानंतर प्रक्रियेला वेग येतो. मात्र यंदा कापूस बाजारातील अस्थिरता, कमी आवक आणि वित्तीय अडचणींमुळे अनेक कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकले नाहीत. एका कारखान्यात दररोज किमान ७० ते ८० कापूसगाठी (प्रत्येकी १७० किलो रुई) तयार केल्या जातात..Cotton Production: कापूसगाठींच्या उत्पादनात घटीची शक्यता.अनेक कारखाने बंदखानदेशात सुमारे ११२ जिनिंग-प्रेसिंग कारखाने आहेत. त्यापैकी दरवर्षी ७५ ते ८० कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असतात. दर वर्षी खानदेशात २२ ते २५ लाख कापूसगाठींचे उत्पादन होते. मात्र यंदा कापूस उत्पादनाबरोबरच कापूसगाठींच्या उत्पादनातही घट झाली आहे. ऑक्टोबर ते सप्टेंबर असा १२ महिन्यांचा कापूस प्रक्रिया हंगाम असतो. यंदा हा हंगाम एक ते दीड महिना आधीच संपल्याचे सांगितले जात आहे..Khandesh Cotton Market: खानदेशात कापूस आवकेत घट.ऑक्टोबरपासूनच अडचणीगेल्या ऑक्टोबरमधील पावसामुळे कापसात ओलाव्याची समस्या निर्माण झाली. त्यातच कमी आवक आणि बाजारातील अस्थिरता यामुळे जिनिंग-प्रेसिंग उद्योगासमोर अडचणी उभ्या राहिल्या. कापसाचे दर दबावात असल्याने अनेक कारखानदारांनी सावध भूमिका घेतली. डिसेंबरमध्ये सरकीच्या दरातही घसरण झाली. त्यानंतर ‘सीसीआय’ने कापूस खरेदी सुरू केल्याने बाजारात स्पर्धा वाढली. खासगी कारखानदारांनीही खेडा खरेदीच्या माध्यमातून कापूस खरेदीला वेग दिला. त्यामुळे कापूस दरात काहीशी सुधारणा झाली; मात्र त्यानंतर दर पुन्हा घसरले..यंदा प्रक्रियेला मोठा फटकाखानदेशात यंदा सुमारे ७५ जिनिंग-प्रेसिंग कारखाने कार्यरत होते. साधारणपणे जूनअखेरपर्यंत, तर काही कारखान्यांमध्ये जुलै महिन्यातही कापूस प्रक्रिया सुरू असते. मात्र यंदा मेअखेरीपासूनच कापूस प्रक्रिया उद्योगाची गती मंदावली. कापसाची आवक लक्षणीय घटल्याने कारखान्यांना पुरेसा कच्चा माल मिळाला नाही. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत एका कारखान्याला दररोज ३०० ते ३५० क्विंटल कापसाची गरज होती. त्या काळात मजूरही उपलब्ध होते आणि बहुतांश कारखाने मेपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत होते. त्यानंतर कापसाची आवक आणखी कमी झाल्याने प्रक्रियेचा वेग मंदावत गेला आणि जुलैमध्ये बहुतांश कारखान्यांतील कापूस प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.