Nagpur News : दरवर्षी दसरा दिवाळीत लागणाऱ्या पैशाची सोय पहिल्या वेचणीतील कापसाच्या विक्रीतून होत होती. यावर्षी मात्र संततधार पावसाच्या परिणामी बोंडे उमलण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे कापूस हंगाम लांबणीवर पडण्याची भीती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
जळगाव खांदेश परिसरात कापसाची बहुतांशी ठिबकवर लागवड होते. त्यामुळेच या भागातील शेतकरी मॉन्सूनपूर्व कपाशी लागवड करतात. सरासरी मे मध्ये या भागात कापसाची लागवड होते. हा कापूस दरवर्षी दसरा, दिवाळीला काढणीसाठी येतो. त्यामुळे सण उत्सवाकरिता लागणाऱ्या पैशाची सोय करणे शक्य होते. यावर्षी देखील कापसाला बोंडधारणा होत ते परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे.
परंतु पावसाची संततधार असल्याने यातील बहुतांश बोंडे फुलली नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ विवेक शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात त्यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी एका झाडावर ४० ते ४५ बोंडे लगडलेली असून त्यातील दोन ते तीन बोंडेच उमलली असल्याचे समोर आले.
पावसाची संततधार सुरू आहे. त्याच्या परिणामी पिकाला सूर्यप्रकाशच मिळाला नाही. त्याचाही परिणाम बोंडे फुलण्यावर झाला आहे. परिणामी यंदाच्या हंगामात कापसाचा हंगाम काही दिवस लांबेल, अशी भीती वर्तविली जात आहे. त्याच कारणामुळे दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात कापसाची मोठी आवक होईल, ही शक्यताही मावळली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.