Cotton Market : कापूस दर वाढणार; देशातील उत्पादनातील घट जास्त

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीनं भारताचं कापूस उत्पादन ३१३ लाख गाठींपर्यंत कमी झाल्याचे स्पष्ट केले.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Price : देशातील कापूस उत्पादनातील घट जास्त असल्याचं आता स्पष्ट होत आहे. शेतकरी सुरुवातीपासूनच उत्पादन घटल्याचं सांगत होते. पण उद्योगांनी उत्पादन जास्त असल्याची री कायम ठेवली होती.

आता अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीनं (USDA) भारताचं कापूस उत्पादन (India Cotton Production) ३१३ लाख गाठींपर्यंत कमी झाल्याचे स्पष्ट केले. देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केल्यास दर सुधारण्यास अनुकूल स्थिती असल्याचं अभ्यासकांनी सांगितले.

युएसडीने कापूस उत्पादन आणि वापरचा मार्च महिन्याचा अहवाल काल सादर केला. या अहवालात युएसडीएनं जागतिक कापूस उत्पादन आणि वापर गेल्यावर्षीपेक्षा कमी राहील अस म्हटलंय.

तर जागितक शिल्लक साठा ६४ लाख गाठींनी अधिक राहील, असा अंदाज व्यक्त केला. यंदा अमेरिका, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील कापूस उत्पादन घटले. चीनमध्ये मात्र उत्पादन वाढल्याची नोंद आहे.

Cotton Market
Cotton Rate : खानदेशात कापूस दर दबावातच

युएसडीएच्या मते, भारतात मागील हंगामात ३१२ लाख गाठी कापूस उत्पादन झालं होतं. ते यंदा ३१३ लाख गाठींवर स्थिरावेल.

तर वापर मागील हंगामातील ३२ लाख गाठींनी कमी होऊन २८८ लाख गाठींपर्यंत स्थिरावेल. तसचं कापूस निर्यात १९ लाख गाठींनी घटून २८ लाख गाठींपर्यंत कमी होईल, असा अंदाजही युएसडीएनं व्यक्त केला.

जागतिक कापूस वापर यंदा कमी होण्याचा अंदाज असला तरी चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशकडून कापसाला मागणी आहे. चीनची कापूस आयात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीशी घटून ९६ लाख गाठींवर पोचेल.

तर पाकिस्तानची आयात जवळपास गेल्यावर्षीऐवढीच राहून पाकिस्तान यंदा ५५ लाख गाठी कापूस आयात करेल. बांगलादेशची कापूस आयात मात्र यंदा ५ लाख गाठींनी कमी राहण्याचा अंदाज आहे. यंदा बांगालदेश ९९ लाख गाठी कापूस आयात करेल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला.

देशातील माॅन्सूनवर एल निनोचा परिणाम होणार असेल तर कापूस दरात मात्र चांगली तेजी येऊ शकते, असं शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं.

युएसडीए पुढील काळातही कापूस उत्पादनाचा अंदाज बदलू शकते. त्यामुळं देशातील उत्पादनातील घट जास्त आहे, हे स्पष्ट होतंय. त्यामुळं पुढील हंगामासाठी शिल्लक कापूस कमी राहील. त्यातच एल निनोच्या बातम्या सध्या सुरु आहेत.

एल निनोचा प्रभाव आपल्या माॅन्सूनवर किती होईल? हे आताच सांगता येणार नाही. पण याबाबत एप्रिल किंवा मे महिन्यात चित्र स्पष्ट होऊ शकतं. युएसडीएनं कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केल्यामुळं कापूस दराला आधार मिळेल, असं शेतीमाल बाजार अभ्यासक सुरेश मंत्री यांनी सांगितलं.

कापूस दर दबावात का?

देशातील बाजारात आज केवळ १ लाख गाठी कापसाची आवक झाली होती. तर युएसडीएनंही उत्पादन घटीचा अंदाज जाहीर केला. पण कापूस दरावरील दबाव कायम आहे. आज कापसाला सरारी ७ हजार ८०० ते ८ हजार २०० रपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

कापसाचे भाव कमी असल्यानं अनेक शेतकरीही पॅनिक सेलिंग करत आहेत. याचा दबाव दरावर आला. मार्च महिन्यात शेतकरी कापूस विकतील, याची जाणीव असल्यानं बाजार दबावात ठेवला जातोय. त्यामुळं शेतकऱ्यांनी शक्य असल्यास थांबावे.

Cotton Market
Cotton Market : शेतकऱ्यांकडून निम्म्या कापसाची विक्री; दर वाढतील का?

आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर कापूस दर सुधारतील. कापसाची सरासरी भावपातळी८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळं शेतकऱ्यांनी किमान ८ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही.

पण बाजाराचा आढावा घेऊनच टप्याटप्यानं विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

देशातील कापूस उत्पादन घटल्याचा आधार कापूस दराला मिळेल. कापसाचे दर सध्याच्या दरावरून सुधारतील. पण मार्च महिन्यात बहुतेक व्यापारी आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. त्यामुळं मार्चमध्ये दरात चढ उतार राहू शकतात.
सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार अभ्यासक
मागील काही दिवसांपासून बाजारातील कापूस आवक वाढली आहे. त्यामुळं कापसाचे दरही दबावात आले. मार्च महिन्यात आवकेचा दबाव जास्त राहण्याची शक्यता आहे. याचा दबाव दरावर येत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी शक्य असल्यास मार्चनंतर विक्री करावी. चांगला भाव मिळू शकतो.
राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com