Rahul Gandhi statement : अमेरिकेतून कापूस आयात केली तर भारतातील कापूस उत्पादक शेतकरी आणि कापूस उद्योग नष्ट होईल. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार करार एकतर भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्याला मारेल वा वस्त्रोद्योगाला संपुष्टात आणेल किंवा दोघांना समूळ नष्ट करेल अशी भीती व्यक्त करत राहुल गांधी यांनी कराराला 'शरणागती डील' म्हटले आहे.