Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Ginning Industry : खानदेशात यंदा कापूसगाठींचे किंवा रुईचे उत्पादन कापसाप्रमाणेच कमी होणार आहे. कापसाची आवक यंदा लवकर घटली.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात यंदा कापूसगाठींचे किंवा रुईचे उत्पादन कापसाप्रमाणेच कमी होणार आहे. कापसाची आवक यंदा लवकर घटली. कापसापासून रुई तयार करणारा जिनिंग प्रेसिंग उद्योग आता बंद झाल्याची स्थिती आहे.

यंदा कापूस महामंडळाकडूनही कापूस खरेदीला गती आली होती. परिणामी, बाजारात स्पर्धाही काही दिवस होती. खासगी कारखानदार किंवा खरेदीदारांना कापूस कमी मिळाला. खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखाने दिवाळीनंतर सुरू होतात. लागलीच या कारखान्यांच्या कामास गती येते. परंतु यंदा कापूस बाजारातील अस्थिरता, कमी कापूस आवक, वित्तीय समस्यांमुळे जिनिंग प्रेसिंग कारखाने गतीने कार्यरत नव्हते.

Cotton Market
Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

एका कारखान्यात रोज किमान ७० ते ८० कापूसगाठी तयार होते. खानदेशात सुमारे ११२ जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत. यातील ७५ ते ८० कारखाने दरवर्षी गतीने सुरू होतात. दरवर्षी २२ ते २५ लाख कापूसगाठींचे उत्पादन खानदेशात केले जाते. परंतु यंदा कापूस उत्पादनासह कापूसगाठींचे उत्पादनही कमी दिसत आहे.

ऑक्टोबर ते सप्टेंबर असा १२ महिन्यांचा कापूस प्रक्रिया हंगाम असतो. यंदा हा हंगाम एक ते दीड महिने लवकर संपल्याचे सांगितले जात आहे. पावसाने कापसातील ओलावा, पाऊस व कमी आवक ही समस्या होती. बाजार अस्थिर असल्याने अनेक कारखानदार सावध भूमिकेत होते. कापूसदर दबावात होते.

Cotton Market
Cotton Shortage: कापूसगाठींचे उत्पादन खानदेशात घटले

सरकी दरातही डिसेंबरमध्ये घसरण झाली. सीसीआयने कापूस खरेदी सुरू केल्याने स्पर्धा वाढली आणि खासगी कारखानदारांनी खेडा खरेदीच्या माध्यमातून वेग दिला. कापूस दरात किरकोळ सुधारणादेखील झाली. नंतर दर कमी झाले.

मे अखेरीस मंद गती

सध्या खानदेशात सुमारे ७५ जिनिंग प्रेसिंग कारखाने गतीने सुरू होते. कमाल कारखाने जूनअखेरपर्य़ंत किंवा जुलैतही बऱ्यापैकी कापसावर प्रक्रिया करतात. पण यंदा मेअखेरीस कापूस प्रक्रिया उद्योगाची गती मंदावली.

कारण कापूस आवक कमालीची कमी झाली. एका कारखान्यास रोज ३०० ते ३५० क्विंटल कापसाची गरज डिसेंबर ते एप्रिल या काळात होती. मजूरदेखील उपलब्ध होते. मेपर्यंत कमाल कारखाने पूर्ण क्षमतेने काम करीत होते. नंतर कापूस प्रक्रियेची गती मंद झाली व जुलैत कमाल कारखान्यांतील प्रक्रिया बंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com