Pune News : सध्या कापूस आणि सोयाबीनचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांना हमीभावानेच विक्री करणे फायदेशीर ठरणार आहे. पण सातबारा उताऱ्यावर नोंद नसेल तर हमीभावाने ही पिके विकता येणार नाहीत.त्यासाठी ई-पीक पाहणी करावी लागेल. प्रशासनाने ई-पीक पाहणीसंदर्भातल्या तांत्रिक अडचणी सोडवल्या असून प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी पूर्ण करून हमीभावाने विक्रीसाठी तयारी ठेवावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे..देशातील बाजारात सध्या सर्वच शेतीमालाचे भाव दबावात आहेत. कापूस आणि सोयाबीन गेल्या वर्षीपासून हमीभावाच्या खाली आहेत. त्यातच केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कापूस आयातीवर शुल्क नसेल. त्यामुळे देशात विक्रमी आयात होऊन दर दबावातच राहणार आहेत. .E-Peek Pahani : ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांची धडपड.सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ७ हजार ७१० रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ८ हजार ११० रुपये हमीभाव जाहीर केला. खुल्या बाजारात यंदा कापसाला हमीभावाएढे दर मिळणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त हमीभावाने होणाऱ्या सरकारी खरेदीवर असेल..सोयाबीनचे भावही सध्या दबावातच आहेत. सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये आहे. परंतु बाजारात सध्या सोयाबीन ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयाने सोयाबीन विकले जात आहे. बाजारात सोयाबीन आवक वाढल्यानंतर दरावर आणखी दबाव येणार आहे. तुरीचे भाव सध्या दबावात आहेत. त्यामुळे हमीभावाने कापूस, सोयाबीन आणि तूर विकण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी ठेवावा, असे अभ्यासकांनी सांगितले..E-Peek Pahani : ‘ई-पीकपाहणी’चा खोळंबा.ई-पीक पाहणीचा टक्का वाढलासरकारने यंदा १०० टक्के ई-पीक पाहणी शेतकऱ्यांनीच करावी, असा निर्णय घेतला. त्यामागे पिकाची योग्य नोंद व्हावी आणि त्याआधारे योग्य नियोजन करता यावे, असा उद्देश होता. परंतु ई-पीक पाहणी सुरू झाल्यानंतर त्यात अनेक अडचणी होत्या. मात्र प्रशासनाने यात सुधारणा केल्यामुळे मागील आठवडाभरात ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी कमी झाल्या आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणी सुलभ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. राज्यात २६ ऑगस्टपर्यंत २६ लाख हेक्टरवरील पिकाची ई-पीक पाहणी झाली. एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत १८ टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी झाली. २० ऑगस्टपर्यंत हा आकडा केवळ ७ टक्के होता..गोंदिया आघाडीवर, कोल्हापूर पिछाडीवरआतापर्यंत ई-पीक पाहणीत गोंदिया आणि बुलडाणा जिल्हा आघाडीवर आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी ३६ टक्के ई-पीक पाहणी पूर्ण केली. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच २.६१ टक्केच ई-पीक पाहणी झाली. कोल्हापूर सोबतच सातारा आणि सांगली जिल्ह्यांत ३ टक्क्यांच्या दरम्यान, तर पुणे जिल्ह्यात ५ टक्के ई-पीक पाहणी झाली. एकंदरीतच पुणे विभागात ई-पीक पाहणीला आतापर्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे..ई-पीक पाहणी का करायची?- पीकविम्याची भरपाई.- अतिवृष्टीची मदत.- हमीभावाने कापूस, सोयाबीन, तूर विक्री.- शासकीय योजनांचा लाभ.- लागवड केलेल्याच पिकांची नोंद.- पिकांच्या लागवड, उत्पादनाचा अचूक अंदाज. .शेतकऱ्यांनी कळविलेल्या अडचणी सोडवल्या आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणीची गती मागील आठवड्यात वाढली. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी केली नाही त्यांनी मुदतीत करून घ्यावी. काही अडचणी असल्यास प्रशासनाला कळवाव्यात.- सरिता नरके, राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी प्रकल्प.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.