देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव

२९ जिल्ह्यांमध्ये कोरोना अनियंत्रित; दिल्ली वगळता अन्य जिल्ह्यांत संसर्ग प्रमाण पाच टक्क्यांहून अधिक
Corona
CoronaAgriculture

नवी दिल्ली : देशात पुन्हा कोरोनाचा (Corona) फैलाव सुरू झाला असून, दिल्ली आणि हरियाना या राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. एकीकडे केंद्र सरकारने कोरोनाविषयक नियम शिथिल केले असतानाच कोरोना रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांना दक्ष राहावे लागणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Minister) आकडेवारीनुसार देशातील २९ जिल्ह्यांमध्ये (Country 29 District) कोरोना अनियंत्रित आहे. म्हणजेच दिल्ली वगळता या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण पाच टक्क्यांहून अधिक आहे.

देशात गेल्या २८ दिवसांत देशात ५ हजार ४७४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४० हजार ८६६ जणांना संसर्ग झाला आहे. मात्र या चार आठवड्यांत ५८ हजार १५८ लोक संसर्गातून बरेही झाले आहेत. देशात उपचाराधीन असलेलल्या रुग्णांची संख्या १० हजार ८७० आहे. केरळमधील चौदा जिल्ह्यांमध्ये स्थिती सर्वांत वाईट आहे. या सर्व जिल्ह्यांचा (District Hospital) संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. त्याचप्रमाणे, मिझोराममधील सात जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर १० टक्क्यांहून अधिक आहे आणि तीन जिल्ह्यांमध्ये हा दर ५ ते १० टक्के आहे.

Corona
कृषी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धसका

हरियानातील गुरुग्राममधील परिस्थितीही चिंताजनक आहे. येथे संसर्गाचे प्रमाण ५.८१ टक्के आहे. याशिवाय, मणिपूर आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एक जिल्हा आहे जिथे संसर्ग ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अरुणाचल प्रदेशातील संसर्ग वाढू लागल्याने नागरिकांची तपासणी केली जात असल्याचे आढळून आले आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौलमध्ये तर संसर्गाचे प्रमाण साडेबारा टक्क्यांहून अधिक आहे. गुजरात, (Gujarat) दिल्ली आणि हरियानाचा या राज्यांचा धोका वाढला आहे. गुजरातमध्ये दैनंदिन संसर्गाचे प्रमाण ४२.४ टक्के, दिल्ली ३४.९ टक्के, तर हरियानामध्ये १८.१ टक्क्यांनी वाढले आहे. दिल्लीत संसर्गाचा दर १.२९ टक्का झाला आहे. दादरा आणि नगर हवेली, लक्षद्वीपमध्ये कोरोनाची (Corona) वाढ शून्य आहे. तेथे नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) वाढू लागल्याने दिल्ली, हरियाना, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांना आरोग्य मंत्रालयाने सतर्कता वाढवण्यास सांगितले आहे. या राज्यांमध्ये दैनंदिन संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. म्हणजेच रोज नवीन कोरोना (Corona) रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्य सरकारांना परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घ्यावा लागणार असून, आवश्यकता असल्यास कोविड-१९ बाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी लागतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com