Sugarcane Rate : साखर कारखाने सुरू करण्यास सहकार्य करावं; वाहन धारकांची मागणी, शेतकरी संघटना भूमिकेवर ठाम

Sugarcane Rate Protest : गतवर्षीचा दुसरा हप्ता २०० रुपये व चालूची पहिली उचल ३ हजार ७०० रुपये कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय कोणीही ऊस तोड स्वीकारू नये असे आवाहन शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे.
Sugarcane Rate
Sugarcane Rateagrowon
Published on
Updated on

Sugarcane Rate Kolhapur : ऊस दराबाबत आंदोलन करणाऱ्या संघटना वैयक्तिक व राजकीय स्वार्थापोटी आंदोलन करीत आहेत. सीमाभागातील कारखान्यांपेक्षा शिरोळ, हातकलंगले तालुक्यातील साखर कारखाने जादा दर देत असताना ऊसतोड बंद आंदोलन हे शेतकऱ्यांचे व वाहनधारकांचे नुकसान करणारे आहे. यामुळे कारखाने सुरू करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशा मागणीचे निवेदन ऊस पुरवठादार शेतकरी व वाहनधारकाच्या वतीने शिरोळ तहसीलदार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, सीमाभागातील साखर कारखाने प्रतिटन तीन हजार पन्नास रुपये दर देत आहेत. त्यांनी गेल्या वर्षीचे काही पैसे दिले नाहीत. यामुळे सध्याचे आंदोलन असून, कर्नाटकातील कारखान्याचे जास्तीचे गाळप व्हावे यासाठी हा खटाटोप केला जात आहे. अशी शंका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात येत आहे. कर्नाटकातील साखर कारखान्याचे गाळप दोन ते तीन लाख टन झाले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांच्या गाळपवार परिणाम होऊन हे साखर कारखाने अडचणीत आणण्यासाठी आंदोलन केले जात असल्याची शंका येत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

नायब तहसीलदार विलास भिसे यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी दादासाहेब सावगावे, हरिश्चंद्र पाटील, संजय अनुसे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sugarcane Rate
Kolhapur Jaggery : गूळ कर्नाटकचा, शिक्का कोल्हापूरचा बाजार समितीतील प्रकार; व्यापाऱ्यांच्या चलाखीने शेतकरी अस्वस्थ

शिरोळ तालुक्यात संघटना आक्रमक

शिरोळ तालुक्यात ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय उसाची तोड घेऊ नये यासाठी आंदोलन सुरू आहे. चिंचवाड (ता. शिरोळ) येथे हाळ भागात उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फोडण्याची घटना घडली. यामुळे शिरोळ तालुक्यात ऊस वाहतूकदारामध्ये खळबळ उडाली आहे.

कारखान्यांनी तोडगा काढण्याची गरज

गतवर्षीचा दुसरा हप्ता २०० रुपये व चालूची पहिली उचल ३ हजार ७०० रुपये कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय कोणीही ऊस तोड स्वीकारू नये. संघटनांनी केलेल्या मागणीवर कारखान्यांनी तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करून हंगाम सुरळीत होईल हे पहावे. चालू गळीत हंगामामध्ये साखर कारखान्यांनी पहिल्या ५० दिवसांत कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळप करावा. पुरामध्ये बाधित झालेल्या उसाची प्राधान्याने पहिल्यांदा तोड करण्यात यावी. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करून दडपशाहीने हंगाम सुरु करण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू असे आवाहन शेतकरी संघटनांकडून देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com