Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर कुणाची नियुक्ती करायची यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खलबते सुरू झाली आहेत. शुक्रवारी (ता. ३०) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. .दरम्यान, मंत्री भुजबळ यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी शनिवारी (ता. ३१) बैठक होणार असल्याची माहिती दिली. श्री. तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षातील आणि जनतेच्या मनातील जाणून घेऊन पवार कुटुंबीयांशी चर्चा करून, त्यानंतरच पुढील निर्णय करण्यात येईल, अशी माहिती दिली..Ajit Pawar Death: राज्यात बाजार समित्या बंद.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार यांचे राजकीय वारस कोण असेल, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. यातच पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी भेट घेतली..या वेळी पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले, की अजित पवार यांच्या जाण्यामुळे मोठा आघात झाला आहे. अजून विधी होणे बाकी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पद आणि त्यांच्याकडील खात्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधी पूर्ण झाल्यानंतर आम्ही पवार कुटुंबीयांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुढील निर्णय होईल..Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्याकडे मागणी.श्री. तटकरे म्हणाले, की अजितदादांच्या अकाली जाण्याने आम्हाला प्रचंड धक्का बसला आहे. या धक्क्यातून अजून कोणीही सावरलेले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे क्लेशदायक आहे. आज आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार आणि संपूर्ण परिवार धार्मिक विधी करीत आहेत. हे सर्व झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. जनतेच्या मनातले तसेच आमदारांच्या मनातले जाणून घेतल्यानंतर त्यांच्याशी बोलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही प्रत्येक कृती संवेदनशीलपणे करू..बैठकीबाबत संभ्रम?मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी शनिवारी बैठक बोलाविली असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांची निवड करावी अशी सर्वांची भावना आहे आणि ती काही चूक नाही. बैठक झाल्यानंतर कदाचित लगेचच शपथविधीही होऊ शकतो, असेही ते म्हणाले. मात्र काही वेळातच राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी अशी बैठक होणार नसल्याचे सांगून गोंधळ उडवून दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.