Clean Water Supply: सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणाच्या जलवाहिनेनद्वारे उरण पूर्व भागात केला जाणारा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गढूळ आणि दूषित येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. .जुलैच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढल्यापासून उरण पूर्व भागातील ग्रामस्थांना हेच गढूळ पाणी वापरावे लागत असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हेटवणे धरणातील पाणी सिडको हद्दीत आणि उरण पूर्व भागातील गावांना पुरवले जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणातील पाणीपातळी खालावल्याने सिडकोने पाणीकपात केली होती..Farmers Demand: सहा महिन्यांत पाणी न मिळाल्यास जलसंपदा मंत्र्यांच्या दारात ठिय्या : ॲड. शिवाजीराव काकडे .त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले. गव्हाणफाटा येथे सिडकोचे जलशुद्धीकरण केंद्र असल्यामुळे त्यापुढील भागाला शुद्ध पाणी मिळते, परंतु पेण तालुक्यातील जिते गावापासून ते उरणमधील गव्हाणफाटा दरम्यानच्या अनेक गावांना मात्र मागील दोन आठवड्यांपासून गढूळ पाणीच मिळत आहे..Agri Irrigation Crisis: पिके वाचवायची कशी? ‘उपसाबंदी’मुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट.या परिस्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी बाटलीबंद पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे, तर गरीब व आदिवासी बांधवांना नाइलाजाने हेच दूषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे. नागरिकांना अशुद्ध आणि दूषित पाणी का दिले जाते, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत..सिडकोने या संपूर्ण पट्टयाला तत्काळ शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. उरण पूर्व भागातील अनेक गावे जलशुद्धीकरण केंद्राच्या आधीच्या टप्प्यात असल्याने त्यांना थेट गढूळ पाणी मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.