Smart Caffe Toilet : हिंगणघाटमध्ये पहिल्या ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती

Rural Development : नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगर परिषदेने राज्यात पहिल्यांदाच ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे.
Smart Toilet
Smart ToiletAgrowon

Wardha News : नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगर परिषदेने राज्यात पहिल्यांदाच ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे. केवळ १० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ या संकल्पनेला अनुसरून राज्यात प्रथमच स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती नगर परिषदेद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील निसर्गमय परिसरात अगदी २०० स्केअर फूट इतक्या कमी जागेत हे टॉयलेट स्थापित करण्यात आले आहे.

Smart Toilet
World Toilet day : शौचालय दिनानिमित्त राबविणार विशेष मोहीम

यामध्ये एक कॅफे, पुरुष व महिलांकरिता प्रत्येकी २ पाश्‍चात्त्य पद्धतीची शौचालये, पुरुषांकरिता १ मुतारी, वॉश बेसिन तसेच महिलांकरिता सॅनिटरी वेडिंग मशिन या प्रकारच्या अत्याधुनिक सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समोरील दर्शनीय भागात कॅफे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागरिकांना स्वास्थवर्धक व आरोग्यदायी अंकुरित कडधान्य व ताज्या फळांचे ज्यूस उपलब्ध करून देण्यात येतील.

या स्मार्ट कॅफेचे व्यवस्थापन बचत गटाच्या महिलांना देण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नागरिकांना टॉयलेटच्या टेरेसवर बसून ज्यूस पिण्याचा आनंद घेता येणार आहे.

Smart Toilet
Toilet Scheme : वैयक्तिक शौचालयाचे अनुदान वेळेत द्या, अन्यथा निलंबन अटळ

या स्मार्ट कॅफे टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून या उपक्रमाला प्रसिद्धी देण्यात आली आहे. स्मार्ट कॅफे टॉयलेटच्या निर्मितीसाठी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, नगर अभियंता पटेल, कनिष्ठ अभियंता अली यांनी विशेष सहकार्य केले.

‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ अभिनव उपक्रम ः कर्डिले

कमी खर्चात अधिक उपयुक्त उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. हिंगणघाट नगर परिषदेने अतिशय कमी खर्चात उत्तम असे दुहेरी उपयुक्त मॅाडेल तयार केले आहे. केंद्र आणि राज्य शासनाने देखील या टॉयलेटची दखल घेतली आहे. येत्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी असे टॉयलेट उभे राहतील, यासाठी प्रयत्न करू. यासाठी अन्य नगरपरिषदांनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com