Valu Depo : राज्यात ६५ वाळू डेपोची उभारणी; आता ऑनलाईन खरेदी करता येणार वाळू

Online Buying of Sand : आता महाखनिज या संकेतस्थळावरून ऑनलाइन वाळू खरेदी करता येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय वाळू डेपोची संख्या निश्चित केली आहे.
Valu
ValuAgrowon

Sand Depo : राज्य सरकारनं नवीन वाळू धोरण लागू केलं आहे. त्यानुसार आता राज्यातील ६५ वाळू डेपोतून वाळूची खरेदी करता येणार आहे. राज्यातील पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती जिल्ह्यात वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणानुसार ६०० रुपये ब्रासनं वाळूची खरेदी करता येणार आहे. राज्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न करत आहे. तसेच नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी धोरण राबवलं जात आहे.

आता महाखनिज या संकेतस्थळावरून ऑनलाइन वाळू खरेदी करता येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय वाळू डेपोची संख्या निश्चित केली आहे. वाळू खरेदीदार महाखनिज या संकेतस्थळावरून वाळूची खरेदी करू शकतात. महाखनिजवर वाळू विक्री उपलब्ध करून दिली असून ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर घरपोच वाळू मिळणार आहे.

जिल्हानिहाय वाळू डेपो

राज्यातील ६५ वाळू डेपोपैकी १८ वाळू डेपो पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत. तर नागपूर जिल्हयासाठी ३५, अमरावती जिल्हयासाठी ४ आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ८ डेपो उभारण्यात आले आहेत.

महाखनिजवर वाळू खरेदी

यामध्ये वाहनांचा पर्याय नोंदणी करणेही बंधनकारक करण्यात आलं आहे. ऑनलाइन नोंदणी करताना वाळू खरेदीदाराला वाहन क्रमांक नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. तसेच या महाखनिजवर दररोज होणार वाळूच्या विक्री संबंधीची माहितीही देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com