शेतकरी नियोजन । पीक ः हरभराशेतकरी : अशोक पुंजाजी मवाळगाव : रा. कासारखेड,ता. मेहकर, जि. बुलडाणाएकूण शेती ः ४० एकरहरभरा क्षेत्र ः ९ एकर.कासारखेड येथील अशोक पुंजाजी मवाळ यांनी गेली अनेक वर्षे रब्बी हंगामात हरभरा लागवडीचे सातत्य ठेवले आहे. त्यामुळे या पिकांमधील त्यांचा अनुभव दांडगा आहे. या वर्षीही त्यांच्याकडे नऊ एकरात हरभऱ्याची पेरणी केली आहे. सध्या पीक जोमदार दिसत आहे. त्याच्या काटेकोर नियोजनाला हवामानाची विशेषतः उत्तम थंडीची साथ मिळाल्यामुळे या वर्षी उत्पादनामध्ये दरवर्षीपेक्षा वाढ मिळू शकते. त्यांच्याकडे पारंपरिक हरभऱ्यासोबतच काबुली हरभऱ्याचीही लागवड असते. या हंगामात विराट (काबुली) हरभऱ्याची लागवड करून त्यातून अधिकाधिक उत्पादन मिळविण्यात त्यांनी यश मिळविले आहे. गेल्या हंगामात या हरभऱ्याचे एकरी उत्पादन १० क्विंटल, तर जॅकी -९२१८ या वाणाचे उत्पादन नऊ क्विंटल झाले होते..Chana Farming: उत्पादन वाढीसाठी पेरणीनंतर हरभरा पिकाचे व्यवस्थापन.हरभऱ्यामध्ये रोग किडीचा प्रादुर्भाव ही महत्त्वाची समस्या असते. प्रामुख्याने अळीचा प्रादुर्भाव आणि मर रोगांचे नियंत्रण मिळविण्यासाठी पिकांचे सातत्याने निरीक्षण महत्त्वाचे असते. सोबतच पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत काटेकोर करावे लागते. कारण काबुली हरभऱ्याला पाणी जास्त झाले की तो पिवळा पडतो. सध्या त्यांच्याकडे नऊ एकरात हरभरा पीक आहेच, पण पुढील काळात (डिसेंबर अखेरपर्यंत) तूर पिकाची काढणी झाल्यानंतर आणखी चार एकरांवर हरभरा लागवडीचेही नियोजन असल्याचे अशोकराव सांगतात. या वर्षी चियासीडच्या लागवडीचेही नियोजन आहे. पिकात आजवर एक डवरणीचा फेर घेतला. यामुळे जमीन मशागतीसह पिकाच्या मुळांना मोकळी हवा मिळते. एकवेळ निंदण करून तण नियंत्रण केले आहे..पेरणी व खत नियोजनयंदाच्या रब्बी हंगामामध्ये लावलेल्या ९ एकर क्षेत्रापैकी ५ एकर क्षेत्रावर विराट (काबुली- पांढरा हरभरा) वाण व ४ एकर क्षेत्रावर जॅकी ९२१८ वाण पेरलेला आहे. दोन्ही वाण उच्च उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक व स्थानिक हवामानास अनुकूल असल्यामुळे निवड करण्यात आली आहे.हरभरा पेरणीपूर्व व्यवस्थापनामध्ये बीजप्रक्रिया महत्त्वाची असते. पेरणीपूर्व बियाण्यावर रासायनिक कीडनाशकाची बीजप्रक्रिया केली. त्यानंतर पेरणीच्या अवघ्या अर्धा तास आधी पुन्हा ट्रायकोडर्मा व पीएसबी (PSB) या जैविक घटकांची बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत सुकविले होते. ही बीजप्रक्रिया पूर्ण होताच त्वरित पेरणी केली. .Chana Farming: पेरणीनंतर हरभरा उत्पादन वाढवण्याच्या सोप्या टिप्स.ही पेरणी बीबीएफ यंत्राच्या साह्याने केली. पेरणीसाठी विराट वाण एकरी ४५ किलो बियाणे, तर जॅकी ९२१८ वाणाचे ३५ किलो बियाणे वापरले. बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवण क्षमता चांगली मिळाली आहे. त्याच प्रमाणे पिकाची प्रारंभीची वाढही जोमदार झाली आहे. पेरणीवेळी १०:२६:२६ हे संमिश्र खत एक बॅग प्रति एकरी या प्रमाणात देण्यात आले. मुळांच्या वाढीसाठी व अन्नद्रव्य शोषणासाठी मायकोरायझा ६ किलो प्रति एकर वापरण्यात आले..सिंचनाचे नियोजनहरभरा पेरणीनंतर लगेचच स्प्रिंकलरद्वारे २ तास सिंचन केले. त्यामुळे उगवण एकसारखी झाली. आता शेतातील पीक समान पद्धतीने वाढीवर लागलेले आहे. पेरणीनंतर ४० आणि ८० दिवसांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे सिंचन स्प्रिंकलरद्वारे देण्याचे नियोजन आहे. या पिकामध्ये पाण्याचे अचूक नियोजन केल्यास उत्पादन चांगले मिळते..कीड-रोग नियंत्रणपेरणीनंतर सुमारे २० दिवसांनी पहिली फवारणी करण्यात आली. या फवारणीत रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशक आणि कीड नियंत्रणासाठी कीटकनाशक यांचा समावेश होता. सोबतच पिकाच्या उत्तम वाढीसाठी १९:१९:१९ विद्राव्य खत, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये व स्टिकर मिसळले होते. या संतुलित फवारणीमुळे पिकाची वाढ सध्या निरोगी, तजेलदार व समाधानकारक आहे. संभाव्य फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत रोग-कीड नियंत्रणासाठी आणखी दोन प्रतिबंधात्मक फवारण्या करण्याचे नियोजन आहे. अशा प्रकारच्या नियोजनातून हरभऱ्याची उत्पादकता एकरी ८ ते १२ क्विंटलदरम्यान मिळण्याचा त्यांचा अंदाज आहे.अशोक पुंजाजी मवाळ, ९२८४०१०४११(शब्दांकन ः गोपाल हागे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.