Yashomati Thakur : सरकार मेळघाटात वेड्या सारखं काम करतयं : यशोमती ठाकूर यांची टीका

Amravati Melghat Water Shortage : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील पाणी टंचाई भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
Yashomati Thakur
Yashomati ThakurAgrowon

Pune News : दुष्काळामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईची तीव्रता भीषण आहे. पाण्यासाठी महिलांना धावाधव करावी लागत आहे. यावरून काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील पाणी टंचाई भागाचा रविवारी (ता.२) पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी, पाणी टंचाईवरून राज्य सरकार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. राज्य सरकार मेळघाटात वेड्या सारखं काम करतयं अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

भीषण पाणी टंचाई, दुष्काळ आणि पाऊससाह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील भागांचा काँग्रेस समित्या पाहणी करत आहेत. यात अमरावती विभागाची जबाबदारी आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी रविवारी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटचा दौरा केला.

Yashomati Thakur
MLA Yashomati Thakur : तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीत यशोमती ठाकूरांची बाजी

यादरम्यान मेळघाटातील अनेक गावात यशोमती ठाकूर यांनी पाणी टंचाई समस्याचा व रोजगार हमी योजनेचा आढावा घेत लोकांशी संवाद साधला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांना लोकांची काळजी नाही. सरकार व अधिकारी हलगर्जीपणा करत आहे. तर सरकार वेड्या सारखं काम करत आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टींचा निषेध करतोय. तर पालकमंत्री बेजबाबदारीने वागत असून मेळघाटात काही ठिकाणी कुत्रीम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. तसेच मेळघाटातील लोकांच्या समस्या लवकर सोडवल्या जातील असे आश्वासन यशोमती ठाकूर यांनी दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com