Loksabha Election : शिर्डीसह नगर दक्षिण लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा

Ahmednagar Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. जास्तीतजास्त लोकसभा जागा लढवण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली. त्यात नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याची चर्चा केली.
Congress
CongressNews

Congress Meeting : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत बारा वेळा काँग्रेसचा खासदार निवडून गेला आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेसचा हक्क असल्याचे सांगत ही जागा काँग्रेसला मिळावी.

शिर्डी लोकसभेत शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र ते शिंदे गटासोबत गेल्याने ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी मागणी करत नगर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी या जागेवर दावा केला आहे. नगर येथे लोकसभेसाठी नियुक्त असलेले निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या जात आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हा दावा कायम राहिला तर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी अडचणी निर्माण करणारा असेल असे दिसतेय.

Congress
APMC Election : संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता

नगर जिल्ह्याच्या राजकारणात उत्तरेत विखे पाटील, थोरात, कोल्हे, काळे, गडाख, पिचड, तनपुरे असे मात्तब्बर राजकीय घणारे कार्यरत आहेत. दक्षिण जिल्ह्यात पाचपुते, घले, राजळे, जगताप, नागवडे, पवार, शिंदे, लंके, औटी, झावरे अशी मंडळी राजकारणात सक्रिय आहे.

सहकार चळवळ उभी कऱणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, यांचे पणतू, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू डॉ. सुजय विखे पाटील दक्षिणेचे खासदार आहेत. नगर जिल्ह्याचे राजकारण याच मात्तब्बर नेत्यांमुळे कायम राज्याच्या पटलावर असते.

Congress
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत लोखंडेंनी मारली बाजी

नगरमधील दोन्ही लोकसभा मतदार संघावर काँग्रेसने आता दावा केला आहे. भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र लढणार असल्याचे सध्या तरी दिसतेय. नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे असून शिर्डी शिवसेनेकडे आहे. मागील वेळी राष्ट्रवादीने ही जागा न सोडल्यामुळे विखे पाटलांना भाजपमध्ये जावे लागले.

लोकसभेच्या अनुषंगाने काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत नुकतीच बैठक झाली. च बैठकीत दोन्ही जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. दोन्ही मतदार संघांसाठी चंद्रकांत हंडोरेची निरीक्षक आहेत. शिर्डीचे सध्याचे खासदार एकनाथ शिंदेच्या सेनेबरोबर गेल्याने आता येथून काँग्रेसचा उमेदवार देण्याचा आग्रह सुरू झाला आहे.

नगर दक्षिण राष्ट्रवादीकडे असला तरी मागील काळात अनेक वर्षे काँग्रेसने लढला. बारा वेळा काँग्रेसचा खासदार येथून निवडून आल्याचे सांगितले जात आहे. रविवारी याबाबत नगर, संगमनेरला हंडोरे यांच्यासह दक्षिण मतदार संघाचे नवनियुक्त समन्वयक वीरेंद्र किराड (पुणे), शिर्डी मतदार संघाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड (नाशिक), आमदार लहु कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, किरण काळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. जागावाटप वरिष्ठ पातळीवर होणार असले तरी आघाडीसाठी हा दावा डोकेदुखी ठरण्याची शक्यता दिसतेय.

थोरातांवर काँग्रेसची भिस्त

जिल्ह्यातील राजकारणाची राज्यात आणि देशात चर्चा होत असते. मात्र जिल्ह्यात काँग्रेसची सर्व भिस्त माजी महसूलमंत्री, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावरच असणार आहे. थोरात यांची संयमी व संवेदनशील नेते म्हणून राज्यात ओळख आहे.

सध्या नगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे दोन आमदार आहेत. काँग्रेसबाबत जिल्ह्यात लोकांचे मतही चांगले आहे. मागील वेळी शिर्डी मतदार संघात काँग्रेससोबत सेना-भाजपची लढाई असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी व सेना एकत्र आल्यास येथून आघाडीचा उमेदवार निवडून येईल, अशी आशा आहे. ही सारी भिस्त थोरात यांच्यावर आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com