Corp Insurance : पीक विमा भरपाईत खोडा कुणाचा ? राज्यभरात पीक विमा भरपाईचा गोंधळ मिटता मिटेना

Crop Insurance Compensation : सगळ्यात आधी केंद्र सरकारने पीक विमा भरपाईत गोंधळ कसा घातला ते पाहू… केंद्र सरकारने ८ मार्च रोजी एक आदेश काढून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्याची पध्दत बदलली.
Crop Insurance
Crop InsuranceAgrown

Pune News : राज्यभरात सध्या पीक विम्यावरून बराच गोंधळ सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून पीक विम्याची अग्रीम भरपाई, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पीक कापणी प्रयोगांती मिळणारी भरपाई देण्यात विमा कंपन्यांनी बराच घोळ घातला. यात भर टाकली होती केंद्र सरकारने मार्च महिन्यात काढलेल्या सुधारित भरपाईच्या आदेशाने. केंद्राच्या आदेशानुसार भरपाई देण्यासाठी वेळ लागत असल्याचे आता सांगितले जात आहे.

सगळ्यात आधी केंद्र सरकारने पीक विमा भरपाईत गोंधळ कसा घातला ते पाहू… केंद्र सरकारने ८ मार्च रोजी एक आदेश काढून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्याची पध्दत बदलली. आधी शेतकऱ्यांना दिलेली अग्रीम भरपाई, स्थानिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसानीसाठी दिलेली भरपाई ही पीक कापणी प्रयोगाअंती येणाऱ्या भरपाईतून वजा केली जात होती. पण सुधारित आदेशानुसार ही अग्रीम भरपाई, स्थानिक आपत्ती , काढणी पश्चात नुकसानाची भरपाई ही एकूण संरक्षित रकमेतून दिली जाणार आहे.

Crop Insurance
Rabi Crop Insurance : रब्बी पीकविम्याची तेरा हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा

समजा अग्रीमसाठी ७ हजार मिळाले असतील तर जुन्या पध्दतीत एकूण पीक कापणी प्रयोगा अंती येणाऱ्या भरपाईतून ही रक्कम वजा केली जात होती. पण आता ही रक्कम एकूण संरक्षित रकमेतून म्हणजेच जर विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ५० हजार असेल तर अग्रीमची रक्कम या ५० हजारांतून वगळली जाईल. असेच प्रत्येक टप्प्यातील भरपाईसाठी केले जाणार आहे.

कंपन्यांनी या धोरणाला विरोध केला. यात जळपास एक महिना गेला. पण शेवटी कंपन्या नव्या निकषानुसार भरपाई देण्यास तयार झाल्या. पण हा निर्णय होताहोता एप्रिल गेला. त्यानंतर कंपन्यांनी कोणत्या शेतकऱ्यांना अग्रीम दिला, स्थानिक आपत्ती, काढणी पश्चात भरपाई दिली, त्या शेतकऱ्यांची विमा संरक्षित रक्कम किती आहे आणि पीक कापणी प्रयोगातून किती भरपाई येते याची माहिती काढण्यासाठी वेळ गेला, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Crop Insurance
Crop Insurance : विमा हप्ता ३८२ कोटी रुपये, मात्र परतावा मिळाला ४८ कोटी

काही ठिकाणी शेतकऱ्यांना अग्रीम आणि पीक कापणी प्रयोगाअंती मिळणारी भरपाईही मिळाली. पण काही ठिकाणी अजूनही अग्रीम भरपाईची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. तर काही ठिकाणी पीक विम्याचं नेमकं काय झालं? याची माहिती शेतकऱ्यांना नाही. राज्यभरात पीक विम्याचा एकच प्रश्न नाही. त्यातच केंद्र सरकारने ऐन भरपाई देण्याच्या काळात निकष बदलल्याने आणखी संभ्रम वाढला.

पण शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अग्रीम आणि स्थानिक आपत्तीची भरपाई बहुतांशी शेतकऱ्यांना मिळत आहे. आता पीक कापणी प्रयोगा अंती आलेली भरपाई शेतकऱ्यांना देण्याची तयारी सुरु आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ही भरपाई शेतकऱ्यांना देण्याचे काम सुरु होईल, अशी माहितीही कृषी विभागाच्या वितीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com