Maharashtra Agriculture : नांदेड जिल्ह्यात चालू पावसाळी हंगामात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमानात घट झाली आहे. त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक, वस्तुनिष्ठ आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण करावेत. पीक कापणी प्रयोगांबाबत कोणत्याही प्रकारचा आक्षेप किंवा तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले..कृषी विभागाच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात गुरुवारी (ता. २४) जिल्हास्तरीय पीक कापणी प्रयोग उजळणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी कर्डिले बोलत होते. लातूर विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी उपसंचालक कैलास वानखेडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि ग्रामस्तरावरील कर्मचारी उपस्थित होते..Agriculture Department: आकृतिबंधामुळे कृषी विभागाला नवी संस्थात्मक रचना.पीक उत्पादन निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोग महत्त्वाचे असल्याने ते अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने घेणे आवश्यक आहे. पीकविमा योजनेच्या अनुषंगाने या प्रयोगांना विशेष महत्त्व असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून प्रयोग पूर्ण करावेत. पीक नुकसानीचे निकष विचारात घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. शून्य उत्पादन नोंदविल्या जाणाऱ्या पीक कापणी प्रयोगांचे आवश्यक पंचनामे करावेत..PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.पीक कापणी प्रयोगांच्या दैनंदिन आढाव्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून दररोज पूर्ण झालेल्या प्रयोगांचा अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगांची पाहणी आपण स्वतः, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी करणार आहेत. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून निर्धारित वेळेत प्रयोग पूर्ण करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्या. महेश तीर्थकर म्हणाले, ‘‘यंदा पावसाचे प्रमाण कमी असून पावसात खंड पडल्याने पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या तिन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक पीक कापणी प्रयोग काटेकोरपणे घेऊन त्यामध्ये कोणताही आक्षेप येणार नाही, याची दक्षता घ्यावी..दत्तकुमार कळसाईत यांनी जिल्ह्यात एकूण १,११६ ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. संबंधित कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करावी. शेतातील वस्तुस्थिती जाणून घेऊन उत्पादनाची अचूक नोंद करावी. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रयोग पूर्ण करून त्याबाबत कोणताही आक्षेप राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.