Cotton Production : कापूस परिषदेत घटते क्षेत्र, उत्पादकतेवर चिंता व्यक्त

Cotton Council : कपाशी पिकाचे घटते क्षेत्र आणि उत्पादकता या विषयी अखिल भारतीय कापूस परिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली.
Cotton Council Chhatrapati Sambhajinagar
Cotton Council Chhatrapati SambhajinagarAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : कपाशी पिकाचे घटते क्षेत्र आणि उत्पादकता या विषयी अखिल भारतीय कापूस परिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली. जिनर्सच्या विविध समस्यांचा या वेळी ऊहापोह करण्यात आला. कॉटन उद्योगाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी शनिवारी (ता. २१) छत्रपती संभाजीनगर येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र जिनर्स कॉटन असोसिएशनच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. खानदेश जिनर्स असोसिएशन आणि विदर्भ कॉटन असोसिएशन या परिषदेसाठी सहभागीदार होते. या परिषदेसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा, उपाध्यक्ष भूपेंद्र सिंग राजपाल, महाराष्ट्र असोसिएशनचे खजिनदार रसदीप चावला, विविध राज्यांच्या जिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थिती होते. या परिषदेला दहा राज्यांतील विविध संघटनांचे एक हजारांवर प्रतिनिधी उपस्थित होते.

Cotton Council Chhatrapati Sambhajinagar
Cotton Council : छत्रपती संभाजीनगर येथे आज कापूस परिषद

यूएसए आणि चीनमधील बदलत्या गतिशीलतेमुळे भारताला जागतिक कापूस बाजारात आपली भूमिका मजबूत करण्याची संधी नेमकी कशी, त्यासाठी विविध मान्यवरांनी परिषदेच्या उद्‌घाटन सत्रात आपले विचार मांडले. या संधींचा पूर्ण फायदा घेण्यासाठी, कार्यक्षमता वाढवणे, उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे, प्रदूषण कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कॉटन विश्‍वातील ब्राझीलच्या गतीला नजरअंदाज करून चालणार नाही, असेही परिषदेत सांगण्यात आले.

Cotton Council Chhatrapati Sambhajinagar
Soybean Cotton Subsidy : सोयाबीन, कापूस अनुदानासाठी ९१ लाख हेक्टर पात्र

भारताची धोरणात्मक स्थिती, उत्पादनावरील तंत्रज्ञानाचा परिणाम आणि स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक कौशल्ये या विषयांवर परिषदेत चर्चा झाली. भारतातील कापसाच्या गाठींचे गेल्या वर्षी झालेले उत्पादन आणि आगामी वर्षातील अंदाज याविषयी संचित राजपाल व राम भल्ला यांनी सादरीकरणातून विवेचन केले. दहा राज्यांतील प्रतिनिधींद्वारे त्या-त्या राज्यांतील हंगामातील शिल्लक कापूस गाठी, आताची पिकाची स्थिती व उत्पादनाचा अंदाज याविषयी मांडणी करण्यात आली. भारताच्या कापूस उद्योगाला नवीन दिशा देण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट होते.

‘सीसीआय’च्या माध्यमातून होणाऱ्या कापूस खरेदीत अद्ययावतता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूर्यास्तानंतर कुठेही खरेदी केली जाणार नाही. ऑनलाइन जिनिंग टेंडर सिस्टीम पहिल्यांदा आणली गेली. सीड खरेदीदारांसाठी सुलभता आणली आहे. जागतिक कापूस बाजाराच्या गरजा ओळखून सुधारणा स्वीकाराव्या लागतील.
ललितकुमार गुप्ता, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
उत्पादन जास्त देणारे बियाणे देण्यासाठी बियाणे टेक्नॉलॉजी आणावी लागेल. केवळ एमएसपी वाढवून उत्पन्न वाढवता येणार नाही. त्यांची उत्पादकताही वाढवावी लागेल.
अतुल गणात्रा, अध्यक्ष, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com